Big Election News: महायुतीचा दणका! ठाकरेंना धक्का देत 'या' महापालिकेत एक-दोन नाही तर 12 नगरसेवक बिनविरोध

शिवसेना शिंदे गटाच्यात प्रतिभा देशमुख या ही बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपाच्या दीपमाला काळे प्रभाग 7 अ मधून बिनविरोध आल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी होती
  • जळगाव महापालिकेत महायुतीचे तब्बल बारा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत
  • बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सहा शिवसेना शिंदे गटाचे तर सहा भाजपचे उमेदवार आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जळगाव:

मंगेश जोशी 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची आज 2 जानेवारी ही शेवटची तारीख होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सगळीकडच्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार होते. अनेक ठिकाणी काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर काही ठिकाणी विरोधात उमेदवारी अर्जच दाखल केले नसल्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे ही आता स्पष्ट झाले आहे. पण राज्यातली अशी एक महापालिका आहे ज्या ठिकाणी महायुतीने ठाकरे बंधूंना जोरदार धक्का दिला आहे. निवडणुकी आधीच महायुतीचे एक दोन नाही तर तब्बल 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. हा ठाकरेंसोबतच काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ही धक्का मानला जात आहे. 

शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे जवळपास 12 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. ही घटना जळगाव महापालिकेत झाले आहे. 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे महायुतीने आर्धी लढाई जिंकल्या सारखेच आहेत. हा ठाकरे बंधूं सोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला ही धक्का मानला जात आहे. या 12 नगससेवकांमध्ये सहा जण हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर सहा जण हे भाजपचे उमेदवार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जण बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जळगावमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. 

नक्की वाचा - देशातील सर्वात जुनी महापालिका कोणती? श्रीमंत महापालिकेत पहिला क्रमांक कुणाचा? 99% टक्के लोकांना माहितच नाही

आता कोण कोण बिनविरोध निवडून आले त्यावर एक नजर टाकूयात. भाजपचे उज्वला बेंडाळे या बिन विरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रभागातील दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे  गौरव चंद्रकांत सोनवणे बिनविरोध आले. या प्रभाग क्रमांक 18 अ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे सोनवणे यांचा मार्ग मोकळा झाला. त्याच बरोबर  शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी हे ही बिनविरोध निवडून आलेत. त्यांच्या प्रभागातील अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली.

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर उतरताच आता टेन्शन फ्री प्रवास! 'या' सेवेचा झाला श्रीगणेशा

शिवसेना शिंदे गटाच्यात प्रतिभा देशमुख  या ही बिनविरोध निवडून आल्या आहेत.  भाजपाच्या दीपमाला काळे प्रभाग 7 अ मधून बिनविरोध आल्या. त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली. डॉ. वीरेन खडके प्रभाग 16 अ मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या समोर असलेल्या मनसेच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे त्यांची विजयी म्हणून घोषणा करण्यात आली. तर  शिवसेना शिंदे गटाचे सागर सोनवणे प्रभाग 2 अ मधून बिनविरोध विजयी झालेत. तिथेही एकही अर्ज राहीला नाही. शिवसेना शिंदे गटाचे विक्रम सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध आले. तर  शिवसेना शिंदे गटाच्या रेखा पाटील आणि  भाजपच्या वैशाली अमित पाटील यांनी ही विजय नोंदवला आहे.  

Advertisement