जाहिरात

देशातील सर्वात जुनी महापालिका कोणती? श्रीमंत महापालिकेत पहिला क्रमांक कुणाचा? 99% टक्के लोकांना माहितच नाही

महापालिकेच्या सदस्य संख्या म्हणजेच निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या सर्वात जास्त ही मुंबई महापालिकेचीच आहे.

देशातील सर्वात जुनी महापालिका कोणती? श्रीमंत महापालिकेत पहिला क्रमांक कुणाचा? 99%  टक्के लोकांना माहितच नाही
  • देशातील सर्वात जुनी महापालिका चेन्नई महापालिका असून तिची स्थापना अठराव्या शतकात झाली होती
  • महाराष्ट्रातील सर्वात जुनी महापालिका मुंबई महापालिका आहे.
  • मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

GK News: सध्या राज्यात महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षा मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सगळीकडे राजकीय पक्षांची, त्यांच्या उमेदवारांची, कोण जिंकणार, कोण हरणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण या महापालिका निवडणुका होत असताना कोणती महापालिका ही देशातील सर्वात जुनी महापालिका आहे हे किती जाणांना माहित आहे. शिवाय सर्वात श्रीमंत महापालिका कोणती आहे हे कुणाला माहित आहे का? शिवाय सर्वात जास्त नगरसेवक कुठल्या महापालिकेत निवडून येतात हे माहित आहे का? पण जवळपास 99%  लोकांनी याची माहिती नाही. तेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 
  
देशातील सर्वात जुनी महापालिका कोणती असा प्रश्न विचारला असता अनेकांना ही बाब माहित नाही. देशातील सर्वात जुनी महापालिका ही चेन्नई महापालिका आहे. त्याची स्थापना 1688 साली झाली होती. तत्कालीन मद्रास महापालिका म्हणून ती ओळखली जात होती. आता ती चेन्नई महापालिका म्हणून ओळखली जाते. चेन्नई ही देशातील सर्वात जुनी महापालिका आहे. पण महाराष्ट्रातली सर्वात जुनी महापालिका कोणती याचं ही उत्तर अनेकांना माहित नाही. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महापालिका ही मुंबई महापालिका आहे. या महापालिकेची स्थापन 1888 साली झाली होती. 

नक्की वाचा - Pune News : अन् पूजा मोरे पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, "राजकारण घाणेरडं..पण माझ्या बापाने.."

आता आपण देशातील सर्वात श्रीमंत महापालिका कोणती हे पाहाणार आहोत. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ही मुंबई महापालिका आहे. या महापालिकेचे बजट छोट्या राज्यां पेक्षा जास्त आहे. जवळपास 74 हजार कोटींची बजेट हे एकट्या मुंबई महापालिकेचे आहे. त्यामुळे ही महापालिका देशात सर्वात श्रीमंत आहे. त्याच बरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका कोणती असा ही प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याचे उत्तर पुणे महापालिका आहे. कारण ही महापालिका जवळपास  516.18 चौरस किमी मध्ये परसरली आहे. तिचा विस्तार मोठा आहे. 

नक्की वाचा - BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे

तर महापालिकेच्या सदस्य संख्या म्हणजेच निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या सर्वात जास्त ही मुंबई महापालिकेचीच आहे. मुंबई महापालिकेत जवळपास 227 नगरसेवक थेट जनतेतून निवडून दिले जातात. तर देशात महाराष्ट्रातच सर्वाधिक महापालिका आहे. महाराष्ट्रात एकूण 29 महापालिका आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका आहे. ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका आहेत. तर  सर्वात शेवटी स्थापन झालेली महापालिका ही जालना महापालिका आहे. राज्यातील ही 29 वी महापालिका आहे. 

  • देशातील पहिली महापालिका     चेन्नई    1688
  • राज्यातील पहिली महापालिका    मुंबई   1888 
  • देशातील श्रीमंत महापालिका       मुंबई 
  • सर्वाधिक महापालिका असलेला जिल्हा ठाणे   


  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com