- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकृत प्रीपेड टॅक्सी आणि ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे
- प्रवाशांना विमानतळावरून थेट तिकीट बुक करून पारदर्शक भाड्याने प्रवास करता येणार आहे
- ही प्रीपेड सेवा २४ तास उपलब्ध असून प्रवाशांची आर्थिक फसवणूक टाळण्यास मदत करेल
Navi Mumbai Airport: नवी मुंबईचे एअरपोर्ट आता सुरू झाले आहे. रोज विमान सेवा या विमातळावरू ये जा करत आहेत. प्रवाशांची संख्या ही दिवसेन दिवस वाढत आहे. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकृतपणे 'प्रीपेड टॅक्सी' आणि 'प्रीपेड ऑटोरिक्षा' सेवा सुरू केली आहे. यामुळे आता प्रवाशांना विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सी किंवा रिक्षासाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सेवेमुळे पारदर्शक भाडेदर आणि लूट थांबण्यास मदत होणार आहे. अनेकदा विमानतळाबाहेर रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. अनेक वेळा भाड्यावरून वाद होतात. भाडे ही वाढवून सांगितले जाते. हे टाळण्यासाठी प्रशासनाने नवीन आणि सुधारित भाडेदर जाहीर केले आहेत. हे दर अंतराप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. ते पूर्णपणे पारदर्शक असतील असं ही सांगण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळावर ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे टेन्शन मिटणार आहे.
विमानतळ परिसरात प्रवाशांसाठी विशेष 'प्रीपेड काउंटर' उभारण्यात आले आहेत. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी या काउंटरवरून थेट तिकीट बुक करता येईल. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक प्रवाशांची होणारी फसवणूक थांबणार आहे. देशातील अनेक विमानतळावर ही सेवा आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या देशी आणि विदेशी प्रवाशांची फसवणूक टाळता येते. शिवाय आगावू बुकींग ही या निमित्ताने प्रवाशांना करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ हे शहरापासून थोडे दुर आहे. अशा वेळी ही सुविधा प्रवाशांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.
नवी मुंबई एअर पोर्टवरून 25 डिसेंबरपासून हवाई वाहतूकीला सुरूवात झाली आहे. त्यात दिल्ली, जयपूर, गोवा, बंगळूर या ठिकाणी सुरूवातीच्या काळात उड्डाण होत आहेत. मोठ्या प्रमाणात प्रवाशी नवी मुंबई विमानतळाचा वापर करत आहेत. या ठिकाणी हळूहळू उड्डाणांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांची रहदारी या विमानतळावर वाढणार आहे. या सर्व बाबी लक्षात ही प्रिपेड सेवा प्रवाशांच्या फायद्याची ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world