विधानपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या संस्थांवर धाडसत्र; कारवाईच्या टायमिंगची सर्वत्र चर्चा

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर शासकीय विभागांनी धाड टाकली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मोठी घडमोड समोर येत आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडी पडल्या आहेत.  छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि सोलापूर येथे विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्था आहेत. तिथे धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवरील धाडीचं टायमिंग याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विवेक कोल्हे यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभागाने केलेल्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर शासकीय विभागांनी धाड टाकली आहे. राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभागाचे छापे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

(नक्की वाचा- जरांगेंनी गंभीर आरोप केलेला मुख्यमंत्र्यांचा तो OSD कोण?)

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी शिक्षण संस्थेत पथकाकडून चौकशी केली जात आहे. कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे. धाडीबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत फूट

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अॅड. महेंद्र भावसार तसेच मूळचे भाजपचे असलेले मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र एकजूट बघायला मिळत असून वरिष्ठांच्या आदेशानंतर काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे. ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे एकमेव नाशिकचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.

(नक्की वाचा- नायक आणि खलनायकाच्या रुपकांचा खेळ; आरोप-अपमानांमुळे आंध्र प्रदेशात सुरू झाला नवा अध्याय)

नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार 

  • संदीप गुळवे (शिवसेना - ठाकरे गट)  

  • महेंद्र भावसार (अजित पवार गट)

  • किशोर दराडे (शिवसेना शिंदे गट)

  • विवेक कोल्हे (अपक्ष – भाजप बंडखोर)

Topics mentioned in this article