Exit Polls : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे?

Exit Polls 2024 : मागील दोन लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा अंदाज काय होता? कुणाचे अंदाज बरोबर आले ते पाहूया

Advertisement
Read Time: 2 mins
Exit Polls 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे निष्कर्ष काय होते?
मुंबई:

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांचं मतदान आता समाप्त झालं आहे. अंतिम निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. हे निकाल जाहीर होण्यापूर्वी सर्वांनाच एक्झिट पोलचे निष्कर्ष काय आहेत? याची उत्सुकता असते. पुढील दोन दिवस सर्वत्र एक्झिट पोलच्या अंदाजांची चर्चा असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा अंदाज काय होता? कुणाचे अंदाज बरोबर आले ते पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एक्झिट पोल 2014 (Exit Poll 2014) आणि प्रत्यक्ष निकाल

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुकेक एक्झिट पोलनं भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचं सरकार सत्तेवर येईल असा अंदाज व्यक्त केला होता. पण, एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात त्यांना अपयश आलंय. 

NDA च्या जागांचा अंदाज

1.    India Today-Cicero:  272

2.    News 24-Chanakya: 340 

3.    CNN-IBN-CSDS: 280 

4.    Times Now ORG: 249 

5.    ABP News-Nielsen: 274 

6.    NDTV-Hansa Research: 279 

 ( नक्की वाचा : Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं )
 


UPA च्या जागांचा अंदाज


1.    India Today-Cicero: 115 

2.    News 24-Chanakya: 101 

3.    CNN-IBN-CSDS: 97  

4.    Times Now ORG: 148 

5.    ABP News-Nielsen: 97 

6.    NDTV-Hansa Research: 103 

2014 प्रत्यक्ष निकाल ( 2014 Actual Results)

NDA - 336, भाजपा - 282

UPA - 60, काँग्रेस - 44


एक्झिट पोल 2014 (Exit Poll 2019) आणि प्रत्यक्ष निकाल

NDA च्या जागांचा अंदाज

1.    India Today-Axis: 339-365 

2.    News 24-Today's Chanakya: 350 

3.    News18-IPSOS: 336 

4.    Times Now VMR: 306 

5.    India TV-CNX: 300 

6.    Sudarshan News: 305 


UPA च्या जागांचा अंदाज

1.    India Today-Axis: 77-108 

2.    News 24-Today's Chanakya: 95 

3.    News18-IPSOS: 82 

4.    Times Now VMR: 132 

5.    India TV-CNX: 120 

6.    Sudarshan News: 124 

2019 प्रत्यक्ष निकाल ( 2019 Actual Results)

NDA - 352,  भाजपा - 303
UPA - 91,  काँग्रेस - 52

( नक्की वाचा : मराठवाड्याच्या राजधानीत अटीतटीचा सामना, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? )
 

2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडी (I.N.D.A.) यांच्यात थेट लढत झाली. सत्तारुढ भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी भाजपाचा कौल मागितला.  पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत एनडीसाठी 400 पार हे महत्त्वकांक्षी लक्ष्य निश्चित केलं आहे. हे लक्ष्य किती यशस्वी होतं, यंदाच्या एक्झिट पोलचे अंदाज किती बरोबर येणार हे 4 तारखेला स्पष्ट होईल.