जाहिरात
Story ProgressBack

मराठवाड्याच्या राजधानीत अटीतटीचा सामना, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

Chhatrapati Sambhaji Nagar : 5 वर्षांपूर्वी धक्कादायक निकाल देणाऱ्या संभाजीनगरचा यंदा खासदार कोण होणार?

Read Time: 3 mins
मराठवाड्याच्या राजधानीत अटीतटीचा सामना, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा चुरशीची तिरंगी लढत झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhaji Nagar Aurangabad lok sabha election 2024 : महाराष्ट्रातील आठ जिल्हे आणि तितकेच लोकसभा मतदारसंघ असलेल्या मराठवाड्याची छत्रपती संभाजीनगर ही राजधानी आहे. स्वातंत्र्यापूर्वी निजामशाहीचा हा संपूर्ण परिसर भाग होता. मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या चळवळीचे प्रणते स्वामी रामानंद तीर्थ यांनी एकेकाळी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. सध्या निझामशाहीतील रझाकारांना सहानुभूती असलेल्या ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षाचे इम्तियाज जलील शहराचे खासदार आहेत. पाच वर्षांपूर्वी चुरशीच्या लढतीत जलील यांनी निसटता विजय मिळवलाय. यंदा संभाजीनगमध्ये तिरंगी लढत झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

5 वर्षांपूर्वी धक्कादायक निकाल

'खान विरुद्ध बाण' ही मांडणी करत शिवसेनेनं मुंबईबाहेर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे नाव औरंगाबाद) बस्तान बसवलं. आक्रमक हिंदुत्वाच्या मांडणीचा शिवसेनेला या जिल्ह्यात चांगलाच फायदा झाला. 1989  ते 2019 या 3 दशकांमध्ये 1998 च्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेनेचा खासदार इथून निवडून आला. मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे तेंव्हाच्या औरंगाबादमधून निवडून आले होते. चंद्रकांत खैरे 1999 पासून सलग चार निवडणुकीत विजयी झाले होते.

पाच वर्षांपूर्वी संपूर्ण देशात आणि राज्यात मोदींची लाट होती. त्यावेळी शिवसेनेचा हिंदुत्ववादी गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात AIMIM चे इम्तियाज जलील निवडून आले. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंवर 4492 मतांनी निसटता विजय मिळवला. 

(नक्की वाचा : भाजपाच्या बालेकिल्ल्यात जरांगे फॅक्टरचा बोलबाला, वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला? )
 

1989 ते 2019 या 3 दशकांमध्ये 1998 च्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना-भाजपा युतीचा खासदार निवडून आला होता. मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे या शिवसेना खासदारांनी शहराचं प्रतिनिधित्व केलं. . तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पावणे तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना एक लाखांचा टप्पाही पार करत आला नाही. ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.

औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर

गेल्या पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीचे पडसाद संभाजीनगरमध्येही झाले. औरंगाबाद हे शहराचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे. शिवसेनेत फुट पडली. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे गटातच कायम राहिले. खैरे अडीच दशकं ज्यांच्या विरोधात होते त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा या निवडणुकीत त्यांना पाठिंबा होता. तर खैरेंचे जुने सहकारी संदीपान भुमरे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन त्यांच्या विरोधात उभे होते. दोन शिवसैनिकांच्या लढतीत आजवर एकही निवडणूक न हरलेले विद्यमान खासदार इम्तियाज जलील देखील रिंगणात होते.

इम्तियाज जलिल यांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता.यंदा वचिंत जलील यांच्यासोबत नाही. वंचितकडून अफसर खान हे मुस्लीम उमेदवा रिंगणात आहेत. त्यामुळे जलील यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे. दुसरिकडं संदीपान भुमरे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानं प्रचाराला फार वेळ मिळाला नाही. खैरे यांनी प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतली होती. शिवसेनेचा नेहमीच्या मतदारानं कुणाला मत दिलंय तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरिक मतं आणि मुस्लीम मतं खैरे किती खेचतात यावर त्यांचा विजय अवलंबून असेल.

( नक्की वाचा : जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा? )
 

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतं सुमारे  22 टक्के आहेत. तर अनुसुचित जाती-जमातींची संख्या 19 ते 20 टक्के आहे.वंचितची सोबत नसताना जलील किती मतं राखणार? उद्धव ठाकरेंची बदललेली प्रतिमा, महाविकास आघाडीचा पाठिंब्याच्या जोरावर खैरे मुस्लिम मतं किती मिळवणार यावरही या निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

मतदारसंघाचे समीकरण

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड, छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर  पश्चिम, छत्रपती संभाजी नगर पूर्व, गंगापूर आणि वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार असून कन्नड या एकमेव मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार आहे.

( नक्की वाचा : Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला )
 

किती झालं मतदान?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 63.55 टक्के मतदान झालं होतं. यंदा 63.03 टक्के मतदान झालंय. संभाजीनगर मध्यमध्ये 60.17, संभाजीनगर पूर्वमध्ये 61.11, संभाजीनगर पश्चिममध्ये 60.58, गंगापूरमध्ये 65.44, कन्नडमध्ये 66.78 तर वैजापूरमध्ये 64.80 टक्के मतदान झालं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Maval Lok Sabha 2024 : श्रीरंग बारणे हटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे दणक्यात एन्ट्री घेणार?
मराठवाड्याच्या राजधानीत अटीतटीचा सामना, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
Narayan Rane has announced who will be the BJP candidate from the Konkan graduate constituency
Next Article
कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले
;