जाहिरात
Story ProgressBack

Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

Exit Poll 2024 : एक्झिट पोल म्हणजे काय? त्याचे निष्कर्ष कसे काढतात? याबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

Read Time: 3 mins
Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच सर्वांचं लक्ष एक्झिट पोलकडं लागलं आहे.
मुंबई:

लोकसभा निवडणूक 2024 चं मतदान समाप्त झालं आहे. यंदा सात टप्प्यात मतदान झालं. 19 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13  मे, 20  मे, 26  मे आणि 1 जून रोजी मतदानाचे पुढील टप्पे झाले. मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच सर्वांना एक्झिट पोलची उत्सुकता असते. एक्झिट पोल म्हणजे काय? त्याचे निष्कर्ष कसे काढतात? याबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एक्झिट पोल म्हणजे काय?

मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे म्हणजे एक्झिट पोल. भारतामध्ये निवडणुकीच्या दरम्यान या प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर एक्झिट पोल जाहीर करता येतो. 

मतदानाच्या दरम्यान मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी एक्झिट पोल लगेच जाहीर करण्यास आयोगानं बंदी घातली आहे. पण, मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर तातडीनं त्याचे विश्लेषण आणि त्यावर चर्चा करण्यास परवानगी आहे. 

इशारा - एक्झिट पोल नेहमी बरोबर असतात असे नाही. यापूर्वी एक्झिट पोल चुकीचे देखील ठरले आहेत. 

एक्झिट पोल करण्याची पद्धत?

सॅम्पल मेथड आणि वेगवेगळ्या एजन्सींच्या सांख्यिकी विश्लेषणाच्या आधारावर एक्झिट पोल मोजले जातात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो.

नमुना निवड  (Sampling) : एक्झिट पोल घेणारे पोलस्टार्स हे वेगवेगळ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारांचा नमुना निवडला जातो. सर्व भौगोलिक भागातील मतदारांचा कल यामध्ये जाणून घेतला जाईल याची यामध्ये खबरदारी घेतली जाते.  

प्रश्नावली (Questioning) : निवड झालेल्या मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केलं? याबाबत प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्यांचे वय, त्यांचे राहण्याचं ठिकाण याची माहिती देखील यासारखे काही प्रश्नही यामध्ये विचारले जातात.

डाटा जमा करणे (Data Collection) : सर्व उत्तरं रेकॉर्ड करुन त्याचा डाटा जमा केला जातो. 

(Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात' )
 

वेटेज (Weightage) : सर्व गटाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल या पद्धतीनं डाटा अ‍ॅडजस्ट केला जातो. उदा: एक्झिट पोलच्या दरम्यान पोलस्टार्स तरुण मतदारांना फारसे बोलले नसतील तर कदाचित त्यांच्या मतांना अधिक वेटेज दिले जाते. एक्झिच पोलचे निष्कर्ष संतुलित समोर यावेत ही पद्धत अवलंबिली जाते. 

विश्लेषण (Analysis) : जमा झालेल्या सर्व डाटाचे तज्ज्ञ व्यक्तींकडून विश्लेषण केले जाते. मतदारांच्या उत्तरांच्या आधारावर निवडणूक निकालाबाबतचा अंदाज व्यक्त केला जातो. 

त्रूटीची शक्यता (Margin of Error) : एक्झिच पोलमधील निष्कर्ष किती प्रमाणात बरोबर किंवा चूक असू शकतात हे देखील निश्चित केले जाते. 

शेवटी हे सर्व अंदाज जाहीर केले जातात. 

( नक्की वाचा : EXCLUSIVE : 4 जूनला लोकसभेचा काय निकाल लागणार? प्रशांत किशोरांचं मोठं भाकीत )
 

2024 चे एक्झिट पोल कधी जाहीर होणार ?

लोकसभा निवडणूक 2024 मधील शेवटचा टप्पा शनिवार 1 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता समाप्त होईल. त्यानंतर अर्ध्या तासांनी म्हणजेच 6.30 पासून एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होण्यास सुरुवात होईल. एक्झिट पोलचे सर्व निष्कर्ष आणि त्यावरील लाईव्ह विश्लेषण समजून घेण्यासाठी वाचा आणि पाहा NDTV मराठी
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Satara Lok Sabha 2024 : उदयनराजे की शशिकांत शिंदे? साताऱ्यात कुणाची जादू चालणार?
Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
Chandrapur Lok Sabha Election Pratibha Dhanorkar Vs Sudhir Mungantiwar Direct Fight
Next Article
चंद्रपुरात जातीय समीकरणाचा भाजपला फटका? सहानुभूती विरूद्ध व्यूहरचना, नेमका कल काय?
;