शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेना शिंदे गटाने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तीन जणांनी हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर फरार झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज सगळीकडे मतदान होत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातही मतदान होत होते. त्यावेळी दोन मोटरसायकल वरून तीन हल्लोखोर आले. अशोक साखर कारखान्या जवळ भाऊसाहेब कांबळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीत होते. त्यावेळी हे हल्लेखोर तिथे आले. त्यांनी गाडीवर गोळीबार केला. मात्र त्यांचा निशाणा चुकला. त्यामुळे भाऊसाहेब कांबळे हे बचावले.
ट्रेंडिंग बातमी - वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...
त्यानंतर भाऊसाहेब कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात हल्लेखोरां विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. याची आता चौकशी केली जात आहे. या मतदार संघात भाऊसाहेब कांबळे यांची लढत काँग्रेसच्या हेमंत ओगळे यांच्या विरोधात आहे. कांबळे यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.