जाहिरात

वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...

ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांनी मतदानाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाण्यात तरी ही स्थिती दिसत आहे.

वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...
ठाणे:

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अनेक ठिकाणी मतदान चांगलं होत असताना काही ठिकाणी हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुंबईतही मतदान कमी होताना दिसत आहे. ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांनी मतदानाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाण्यात तरी ही स्थिती दिसत आहे. अशा वेळी एक मतदार थेट दुबईतून मतदान करण्यासाठी ठाण्यात दाखल झाला आहे. सुट्टी मिळत नसतानाही त्यांने आयडिया करत सुट्टी मिळवलीच आणि मतदानाचा अधिकार बजावला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाण्यातील ओमकार भोसले हा दुबईला कामाला असतो. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. तो दुबईत ताज हॉटेलमध्ये काम करतो. गेल्या तीन चार वर्षा पासून त्याचे दुबईत वास्तव्य आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात दुबईत पर्यटकांची मोठी गर्दी असते. हा काळात दुबईत परदेशी पाहुणेही मोठ्या प्रमाणात येतात. अशा स्थिती या दोन महिन्यात सुट्टी मिळणे अवघड असते. अशा वेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी कसे जायचे असा प्रश्न ओमकार भोसले याच्या समोर होता. काही करून मतदान करायचे असं त्याने ठरवलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी  - रोहित पाटील- संजय काका एकाच वेळी समोरासमोर आले, पुढे काय झालं?

त्यासाठी त्यांनी मॅनेटमेंटला सुट्टीसाठी गळी घातली. पण त्यासा पहिल्या प्रयत्नात काही सुट्टी मिळाली नाही. पण मतदानाची बाब त्याने मॅनेटमेंटला पटवून दिली. त्यानंतर त्याला चार दिवसांची सुट्टी मंजूर झाली. सुट्टी मिळाल्यानंतर ओमकार मतदानासाठी ठाण्यात दाखल झाला. शिवाय त्याने मतदानाचा अधिकारही बजावला. आपण मतदानाला का आलो कोणासाठी आलो हे पण त्याने यावेळी सांगितले. ऐवढीच नाही तर परदेशात ही महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा होते. त्यावेळी कोणाचं नाव घेतलं जातं हे पण त्याने सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - सोलापुरात 'सांगली पॅटर्न', अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना धक्का; काँग्रेसची अपक्षाला साथ

 ओमकार हा कट्टर शिवसैनिक आहे. तो स्वत: तसं सांगतो. एकनाथ शिंदेंचा तो मोठा चाहता आहे. त्यांनी ठाण्यासाठी केलेलं काम प्रेरणादायी आहे असंही तो सांगतो. मंत्री असताना आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक योजना आणल्या. पायाभूत सुविधा दिल्या. गोरगरीबांसाठीही योजना राबवल्या. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहीजेत असं आपल्याला वाटतं असं ओमकार सांगतो. त्यामुळे त्यांनाच मतदान केल्याचंही त्याने स्षष्ट केले. दुबईतही महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा होते. त्यावेळी पुढचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नावाची चर्चा होते असंही त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

दरम्यान मतदान केल्यानंतर ओमकारची चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मतदानाला आल्याबद्दल त्यांनी त्याचे आभारही मानले. शिवाय या पुढे कधी दुबईला आलो तर तुला नक्की भेटन असे आश्वासनही दिले. या भेटीने ओमकारही भारावून गेला. ज्यांना मतदान करायला आलोय त्यांचीच भेट झाल्याने आनंदी झाल्याचंही तो म्हणाला. आता निकाल ऐकल्यानंतरच दुबईला परत जाणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com