Navi Mumbai News : मतदार यादीत वनमंत्र्यांचं नाव सापडेना! या केंद्रावरुन त्या केंद्रावर पळापळ...

वनमंत्र्यांबाबत असा गोंधळ होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Navi Mumbai Municipal Corporation Election 2026 : आज लोकशाहीचा जागर आहे. आज राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकींसाठीचं मतदान सुरू आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान मतदानाला सुरुवात झाल्याच्या पुढील तासाभरात अनेक जिल्ह्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नवी मुंबईत मतदान असलेले वनमंत्री गणेश नाईक आज सकाळीत मतदानासाठी केंद्रावर पोहोचले होते. मात्र त्या केंद्रावरील मतदार यादीत त्यांचं नाव नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगितलं. मात्र तेथेही त्यांचं नाव नसल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं नसल्याचं सांगितलं जात आहे. वनमंत्र्यांबाबत असा गोंधळ होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा - Nagpur News : भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचले!

आज राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान

राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. एकूण 2869 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.