'महायुतीचे नेते एकवचनी रामाचे भक्त' विरोधातला नेता असं का बोलला?

महायुतीचे नेते हे एक वचनी रामाचे भक्त आहेत. रामानं कधीही वचन मोडलं नव्हतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला आहे. सर्वांच्या अपेक्षे पेक्षा वेगळा निकाल लागला. सर्वांचेच अंदाज महाराष्ट्रातल्या जनतेने चुकवले. महायुतीला राज्यात बंपर यश मिळाले.  त्यानंतर विरोधाकही आता बॅकफूटवर गेलेले दिसत आहे. त्यात आता निवडणुकीत महायुती विरोधात असलेल्या एका नेत्याचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. महायुतीचे नेते हे एक वचनी रामाचे भक्त आहेत. रामानं कधीही वचन मोडलं नव्हतं. तेव्हा आता सत्ता आलेली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेलं वचन मोडू नये असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. महायुती सरकारने तसे वचन दिले होते. कर्जमाफी सांगितली होती. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. या पुढच्या काळात या गोष्टींचा पाठपूरावा करणार असल्याचं ही त्यांनी या निमित्ताने सांगितलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी -  मुख्यमंत्री ठरण्याआधीच आता मंत्रिपदासाठी लॉबिंग, उत्तर महाराष्ट्रातले 18 आमदार सरसावले

ईव्हीएम हटवायचे असेल तर संपूर्ण देशातून हटवावे लागेल. अमेरिका सारख्या देशांमध्ये सुद्धा जिथे सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे. तिथे सुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारताने का विचार करू नये असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम बाबत एक तर राज्यकर्त्यांनी त्याची उत्तरे देऊन तो संभ्रम दूर करावा. नाहीतर खुलेपणांने एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी? रावसाहेब दानवे यांनी सांगितला महायुती सरकारचा प्लान

महाराष्ट्रात संख्याबळ पाहता मुख्यमंत्रिपदावर भाजपचाच अधिकार राहतो. त्यामुळे राज्यात भाजपचाचा मुख्यमंत्री होईल असंही ते म्हणाले. सध्या मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाद होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीसाठी वेळ लागत आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 
 

Advertisement