नवी मुंबईत गणेश नाईंकाचा गेम होणार? गल्ली ते दिल्ली सुत्र फिरली, भाजपला ही फटका?

भाजपने ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी देताना बेलापूरमधून संदीप नाईक यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात नवी मुंबईत वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. भाजपने  ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी देताना बेलापूरमधून संदीप नाईक यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे संदीप नाईक यांनी तातडीने भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवाय त्यांना बेलापूरमधून उमेदवारीही मिळाली. यानंतर शिवसेना शिंदे गट चांगलाच सक्रीय झाला आहे. शिवाय नाईक कुटुंबात सत्ता संघर्षात सुरू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली विधानसभेसाठी विद्यमान आमदार गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गणेश नाईक यांच्या प्रमाणे त्यांचे  सुपुत्र संदीप नाईक यांनाही बेलापूरमधून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. संदीप नाईक यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईत राजकीय तणाव वाढला आहे. यामुळे मुळ भाजप कार्यकर्ते हे संभ्रमात आहेत. नक्की साथ कोणाला द्यायची या द्विधा मनस्थितीत ते आहेत.

ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासात 52 कोटीची मालमत्ता जप्त

यासर्व घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे बारकाईने लक्ष आहे. त्यांनी आता सुत्र हलवली आहे. मुख्यमंत्री शिंदे थेट दिल्लीत गेले आहेत. त्यांनी या मतदार संघातील स्थिती अमित शहा यांच्या कानावर घातली आहे. शिवाय गणेश नाईक यांची उमेदवारी रद्द करावी अशी थेट मागणी केली आहे. येवढेच नाही तर हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा असंही सांगितले आहे. तसे झाले तर शिवसेना शिंदे गटाकडून विजय चौगुले हे उमेदवार असतील. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. तसे झाले नाही तरी ते बंडखोरी करतील अशी स्थिती आहे.    

ट्रेंडिंग बातमी - निलेश राणेंबाबत वैभव नाईक यांचे मोठ वक्तव्य, राणे पलटवार करणार?

दुसरीकडे बेलापूरमध्ये विजय नाहटा यांनी अपक्ष म्हणून बेलापूरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. नाहटा हे एकनाथ शिंदेंचेच समर्थक समजले जाता. त्यामुळे सध्याच्या भाजपच्या असलेल्या या दोन्ही जागा धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही झाले तरी भाजपची डोकेदुखी यातू वाढणार आहे. एकडे भाजप पक्षश्रेष्ठी या प्रकरणाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात, हे स्पष्ट होणं बाकी आहे. ऐनवेळी गणेश नाईक यांचा एबी फॉर्म न देऊन त्यांची राजकीय कोंडी करण्याचा शिंदे गटाचा डाव आहे. मात्र भाजप याबाबत का निर्णय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला

संदीप नाईक यांनी तर उघड बंड केले आहे. त्यामुळे नवी मुंबईतली राजकीय स्थिती अवघड होवून बसली आहे. नवी मुंबईचे राजकारण हे नाईक कुटुंबाच्या भोवती फरत आले आहे. यावेळी ही तसेच होत आहे. एकाच घरात आता दोन पक्षांचे उमेदवार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील जनताही काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नाईक कुटुंब नवी मुंबईचे बॉस आपणच आहोत हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. मात्र कुटुंबाच्या राजकीय महत्वकांक्षेपोटी भाजपचे मात्र नुकसानच होणार आहे हे यातून स्पष्ट आहे.