विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात 'दंगल', माजी मंत्री रडल्या !

Harayana Assembly Elections 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं (BJP) 67 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली.

Advertisement
Read Time: 2 mins
H
मुंबई:

Harayana Assembly Elections 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं (BJP) 67 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर 24 तासांच्या आत भाजपामधील नाराजी उघड झाली आहे. पक्षानं पहिल्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. त्याचवेळी तिकीट न मिळाल्यानं तीन मोठ्या नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपामधील नाराज नेत्यांमधील पहिलं नाव आहे करण देव कंबोज. हरयाणा भाजपा ओबीसी मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी इंद्री मतदारसंघातून तिकीट न मिळाल्यानं भाजपामधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कंबोजसह रणजीत सिंह चौटाला आणि कविता जैन यांनीही पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चौटालांचा राजीनामा 

हरयणाचे कॅबिनेट मंत्री चौधरी रणजीत सिंह चौटाला यांचं नाव देखील यादीमधून गायब आहे. पहिल्या यादीत नाव नसल्याचं आढळताच चौटाला यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. चौटाला  काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. 

पक्षातील आणखी काही नेते देखील पहिल्या यादीवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपामध्ये आता राजीनाम्याचं सत्र सुरु झालंय. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीमामा दिलाय. उमेदवारांचा नावं निश्चित करताना पक्षानं महत्त्व दिलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

Advertisement

( नक्की वाचा : एका बाजूला बजरंग, दुसऱ्या बाजूला विनेश, राहुल गांधींच्या फोटोची Inside Story )
 

माजी मंत्री रडल्या

माजी कॅबिनेट मंत्री कविता जैन यांना उमेदवारी न दिल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरु केलं आहे. अनेक नगरसेवकांनी यादी जाहीर होताच राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत ही घोषणा केली. उमेदवारी न मिळाल्यानं कविता जैन इतक्या नाराज झाल्या की त्यांना अश्रू आवरले नाहीत.