जाहिरात

एका बाजूला बजरंग, दुसऱ्या बाजूला विनेश, राहुल गांधींच्या फोटोची Inside Story

काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका बाजूला कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि दुसऱ्या बाजूला विनेश फोगाट  (Vinesh Phogat) उभे आहेत.

एका बाजूला बजरंग, दुसऱ्या बाजूला विनेश, राहुल गांधींच्या फोटोची Inside Story
Haryana Assembly Election 2024 : बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी राहुल गांधींची घेतलेल्या भेटीचा अर्थ काय?
मुंबई:

Haryana Assembly Election 2024 :  राजकारणात प्रत्येक फोटोला खास महत्त्व असतं. त्या फोटोमागे एक गोष्ट असते. विशेषत: विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तो फोटो आला असेल तर त्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु होतात. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका बाजूला कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि दुसऱ्या बाजूला विनेश फोगाट   (Vinesh Phogat) उभे आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या  (Haryana Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर या दोन्ही कुस्तीपटूंनी राहुल गांधींची भेट घेतल्याचं मानलं जात आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसनं या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत जगभरातील कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या बजरंग आणि विनेशला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

राहुल गांधी आणि बजरंग पुनिया यांनी यापूर्वी देखील एकमेकांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हरयाणा दौऱ्यावर आले होते तेंव्हा त्यांनी बजरंगची भेट घेतली होती. त्या दौऱ्यात कुस्तीच्या आखाड्यातही दोघांनी एकमेकांसोबत दोन हाथ केले होते. 

गेल्या काही वर्षात हरयणामध्ये झालेलं पक्षाचं नुकसान यंदा भरुन काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जे मतदारसंघ बऱ्याच काळापासून जिंकण्यात पक्षाला अपयश आलंय त्यावर पक्षानं यंदा विशेष फोकस केलाय.

( नक्की वाचा : 700 कार, 300 बेडरुम... 30 बंगाल टायगर, मोदींचं स्वागत करणारे ब्रुनेईचे सुलतान कोण आहेत? )
 

विनेशशी संपर्क

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसनं विनेश फोगाटशी संपर्क केलाय. विनेशला निवडणूक लढवण्यासाठी पक्षानं बधरा आणि दादरी या दोन जागेचा पर्याय दिलाय. हे दोन्ही मतदारसंघ चरखी दादरी भागात येतात. यामधील दादरीमध्ये विनेशची बहीण बबीता फोगाटनं भाजपाकडून 2019 साली निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत बबिता तिसऱ्या क्रमांकावर होती. अपक्ष उमेदवार सोमबीर संगवान त्या निवडणुकीत विजयी झाले होते. काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.

संगवान आता काँग्रेसमध्ये आहेत. विनेशनं दादरीमधून निवडणूक लढवण्यास होकार दिला तर या जागेवर फोगाट बहिणींमध्ये निवडणुकीची 'दंगल' रंगू शकते. विनेशला जो मतदारसंघ हवाय तिथून तिला उमेदवारी दिली जाईल, असं काँग्रेसकडून विनेशला सांगण्यात आलं आहे. 

बजरंग कुठं उभारणार?

दुसरिकडं बजरंग पुनियानं काँग्रेसकडं बादली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसनं विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांची उमेदवारी निश्चित केली आहे. कुलदीप ब्राह्मण नेते आहेत. त्यांचं तिकीट कापून काँग्रेसला ब्राह्मणांची नाराजी ओढावून घ्यायची नाही. त्यामुळे काँग्रेसनं बजरंगला बहादूरगढ आणि भिवानी या दोन मतदारसंघांचा पर्याय दिला आहे. त्याचबरोबर कोणत्याही जाट बहुल मतदारसंघातही त्याला उमेदवारी देण्याची काँग्रेसची तयारी आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com