Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा परिणाम किती झाला?

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे अनेकांसाठी अनपेक्षित होते. एकनाथ शिंदे सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला फायदा झाला असं मानलं जातंय. त्याचबरोबर या निवडणुकीत 'व्होट जिहाद' हा देखील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा होता. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केलं होता. त्याचा आघाडीला फायदा झाला. पण, विधानसभा निवडणुकीत तसं घडलं नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.

काय सांगते आकडेवारी?

राज्यातील 38 विधानसभा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यापैकी 22 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला 13 जागांवरच समाधान मानावं लागलं. तर तीन जागांवर अन्य पक्ष विजयी झाले. 

काँग्रेसला मोठा फटका

मुस्लीम मतदारांमधील फाटाफुटीचा मोठा फटका काँग्रेसला बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीत 11 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा 5 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सहा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या.

राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपानं या 38 मतदारसंघातही स्वत:ची कामहिरी सुधारली आहे. गेल्या निवडणुकीत यामधील 11 जागा जिंकणाऱ्या भाजपानं यंदा 14 ठिकाणी विजय मिळवलाय. शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा : Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार? )
 

उर्वरित तीन जागांपैकी समाजवादी पक्षानं 2 तर असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षाला फक्त 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि झिशान सिद्दिकी, तसंच काँग्रेस नसीम खान हे दिग्गज मुस्लीम उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

मतविभागणीमुळे नुकसान

विधानसभा निवडणूक निकालाच्या आकडेवारीनुसार काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त मुस्लीम उमेदवार असल्यानं देखील महायुतीचा विजय सोपा झाला. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात AIMIM पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते इम्तियाज जलील यांचा भाजपाच्या अतुल सावे यांनी 2,161 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान (6,507 मतं) आणि समाजवादी पक्षाच्या अब्दुल गफार सय्यद (5,943 ) या मुस्लीम उमेदवारांनी जलील यांच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली. 

Advertisement

भिवंडी पश्मिम मतदारसंघात भाजपाच्या महेश चौगुले यांनी समाजवादी पक्षाच्या रियाझ आझमी यांचा 31,293 मतांनी पराभव केला. या मतदारसंघातही मुस्लीम मतदारांची AIMIM पक्षाचे वारीस पठाण (15,800) मतं आणि अपक्ष उमेदवार विलास पाटील (31,579) यांच्यात विभागणी झाली. त्याचा भाजपाला फायदा झाला.  

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )
 

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात AIMIM पक्षाचे विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल हे फक्त 162 मतांनी विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीतील हा सर्वात निसटता विजय आहे. या मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवार मुस्लीम होते. त्या लढाईत महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त  7527 मतं मिळाली. 
 

Advertisement