राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सर्वात चांगला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. शिवाय महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी भाजप आणि अजित पवारांनी ठेवणीतले फटकारे लगावले. या निकालानंतर तरी काही जणांना शहाणपणा येईल असे अजित पवारांचे नाव न घेता ते म्हणाले. शिवाय जे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत होते, त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. तेच महाराष्ट्रातल्या जनतेने केल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पवारांनी दहा पैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'बच्चा बडा हो गया...", बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला
राज्यात पक्ष तोडफोडीचे घाणेरडे राजकारण झाले. हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेले नाही. त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. महाराष्ट्रातल्या जनतेने तेच केले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनेचे आभार मानत असल्याचे शरद पवार म्हणाले. शिवाय काही जण या निकालातून शहाणपा घेतलील असे वाटते. ते काय करतात हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले. दरम्यान गेली साठ वर्ष बारामतीसाठी काम केले आहे. त्यामुळे तिथल्या सर्व सामान्य माणसाच्या नसा मला माहित आहे. त्यामुळे ते आपल्या मागे उभे राहतील असा विश्वास होता. सध्या तसेच घडत आहे, असेही ते म्हणाले. शिवाय आम्ही मर्यादीत जागा लढवल्या. त्या पैकी सात जागांवर आम्ही जिंकण्याच्या स्थिती आहोत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा - Lok Sabha Elections Results : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला?
दरम्यान देशात लोकसभेचे निकाल लागत असताना आपण काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे आणि सिताराम येचुरी यांच्या बरोबर फोन वरून बोलणे झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बरोबर आपले बोलणे झालेले नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत उद्या म्हणजेच बुधवारी बैठक होणार आहे. त्याला आपण जाणार आहोत. त्या बैठकीत पुढची रणनिती ठरेल असेही त्यांनी सांगितले. शिवाय कोणत्याही शक्यता त्यांनी फेटाळून लावलेल्या नाहीत. अजून संपुर्ण निकाल लागायचे आहेत. त्यामुळे आम्ही वाट पाहाणार आहोत. असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 2 निवडणुकांनंतर काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, कोणत्या राज्यांनी दिला राहुल गांधींना 'हात'?
उत्तर प्रदेशमध्ये लागलेले निकाल हे सर्वांनाच चकीत करणारे आहेत. इंडिया आघाडीने तिथे घेतलेली मेहनत फळाला लागली असेही ते म्हणाले. हिंदी बेल्टमध्ये अजूनही काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान उद्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक दिल्लीत होत असल्याची माहिती पवारांनी दिलीय.