Mumbai BMC Mayor Reservation Lottery: मुंबई महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत OBCवर अन्याय, किशोरी पेडणेकर आक्रमक

Mumbai BMC Mayor Reservation Lottery: मुंबई महापौरपदाच्या आरक्षण सोडत प्रक्रियेवर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Mumbai BMC Mayor Reservation Lottery: ओबीसींवर अन्याय झाल्याचा किशोरी पेडणेकर यांचा आरोप"
Canva And Kishori Pednekar X

Mumbai BMC Mayor Reservation Lottery: राज्यातील 29 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी (22 जानेवारी) सोडत काढण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीनुसार मुंबई महापौरपदी खुल्या वर्गातील महिला उमेदवार विराजमान होणार आहेत.   

शिवसेना (उबाठा) नेत्या किशोरी पेडणेकर आक्रमक | Kishori Pednekar

पण या प्रक्रियेवर शिवसेना (उबाठा) नेत्या आणि मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवलाय. या निर्णयाबाबत कोणालाही पूर्वसूचना न देता नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय. सोडत प्रक्रियेवर निषेध व्यक्त करत किशोरी पेडणेकर सभागृहाबाहेर पडल्या. लॉटरी ठरवून केली, ओबीसीवर अन्याय केला;असंही विधान त्यांनी केलंय. 

महापौरपद आरक्षण सोडत प्रक्रियेचा निषेध नोंदवला 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मागील दोन महापौर खुल्या वर्गातील होते, त्यामुळे नव्या महापौरांची निवड इतर मागासवर्गीय (ओबीसी)  किंवा अनुसूचित जमाती (एसटी) वर्गातून व्हायला हवी होती. ज्या पद्धतीने ही प्रक्रिया (लॉटरी) राबवण्यात आली, त्याचा आम्ही निषेध करतो. 

लॉटरीच्या माध्यमातून महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहील, हे ठरवले जाते. यात सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा प्रवर्गांचा समावेश असतो. प्रवर्ग जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करतात.

Advertisement

(नक्की वाचा: Mayor Reservation Lottery: 15 महानगरपालिकांमध्ये 'महिला'राज! कुठे-कुठे असणार महिला महापौर? पाहा संपूर्ण यादी)

बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर 28 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या होत्या आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली होती. 

Advertisement