जाहिरात

Mayor Reservation Lottery: 15 महानगरपालिकांमध्ये 'महिला'राज! कुठे-कुठे असणार महिला महापौर? पाहा संपूर्ण यादी

Mayor Reservation 2026: 29 पैकी 14 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार असल्याचे आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या लॉटरीनंतर स्पष्ट झाले आहे. 

Mayor Reservation Lottery: 15 महानगरपालिकांमध्ये 'महिला'राज! कुठे-कुठे असणार महिला महापौर? पाहा संपूर्ण यादी
मुंबई:

राज्यात झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. 22 जानेवारी रोजी या सर्व महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. लॉटरी पद्धतीने हे आरक्षण जाहीर करण्यात आले. 29 पैकी 14 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार असल्याचे आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या लॉटरीनंतर स्पष्ट झाले आहे. 

खुला महिला राखीव 

  1. मुंबई 
  2. धुळे 
  3. नवी मुंबई 
  4. नागपूर
  5. नाशिक 
  6. पुणे 
  7. मालेगाव 
  8. मिरा भाईंदर
  9. नांदेड-वाघाळा

Jalna And Latur Mayor Reservation Lottery: अनुसूचित जातीसाठी खालील महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे. 

  1. जालना
  2. लातूर 

Mayor Reservation Lottery : ओबीसी प्रवर्गातील खालील महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित करण्यात आले आहे. 

  1. जळगाव महापालिका
  2. चंद्रपूर महापालिका
  3. अहील्यानगर महापालिका
  4. अकोला महापालिका 

लॉटरी पद्धतीवर विरोधकांचा आक्षेप

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉटरी पद्धतीवर आक्षेप घेतला त्यांनी म्हटले की,  "लॉटरी ठरवून केली म्हणून, या लॉटरी पद्धतीचा आम्ही निषेध करतो." ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुप्रदा फातर्फेकर यांनी म्हटले की, "त्यांनी सांगितलं की 3 हून अधिक एसटी सीट असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो. हा नियम आम्हाला कधी सांगितला नाही, दोनवेळआ खुल्या प्रवर्गातून मुंबईचा महापौर झाला, आता रोटेशनवाईज काढलं तर त्यात मुंबई का नाही ? हा ओबीसींवर अन्याय आहे. 2017,2019 चा महापौर हा खुल्या प्रवर्गाचा बसला होता."

प्रशासनाने आक्षेप नोंदवला

शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना ठाकरेंच्या शिवसेनेने लॉटरी पद्धतीवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल बोलताना म्हटले की, सगळे नियमाप्रमाणे सुरू असून, आक्षेप प्रशासनाने नोंदवून घेतले आहे, ते तपासून प्रशासन याबद्दलचा निर्णय देईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी म्हटले की, सुरूवातीला अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती त्यानंतर ओबीसी आणि शेवटी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. किशोरी पेडणेकर यांनी गेल्यावेळी मुंबईसाठी महिला(खुला प्रवर्ग) असे आरक्षण होते, यंदा ते ओबीसींसाठी असावे अशी मागणी करत आक्षेप घेतला आहे. 

प्रक्रियेत कोणताही गोंधळ नाही, मंत्र्यांचे स्पष्टीकरण

नगरविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटले की, पादर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली असून, त्याचे लाईव्ह चित्रणही मिळते आहे. आक्षेप घेण्याचा त्यांचा अधिकार आहे मात्र प्रशासनाने नियमानुसार प्रक्रिया पार पाडली आहे. मिसाळ यांनी विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाबद्दल बोलताना म्हटले की, "मुंबईला त्यांच्या मनासारखं आरक्षण हवं यासाठी त्यांचा आक्षेप होता. त्यांच्या मनात जे आरक्षण आहे ते कसं निघेल. यासाठी त्यांनी गोंधळ घातला असे मला वाटते." मिसाळ यांनी पुढे म्हटले की, OBC गटात 8 सोडत करायच्या होत्या. 3 वगळून 5 महापालिकांसाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेली. त्यात अर्ध्या म्हणजेच 4 जागा महिलांची आरक्षणे काढली. या प्रक्रियेत कोणताही गोंधळ झालेला नाही.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com