'हे गझनी सरकार, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान, आमच्या प्रचारात हिंदुस्थान'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रकाशित झाली आहे. या मुलाखतीतून ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याता आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रकाशित झाली आहे. या मुलाखतीतून ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला आहे. या मुलाखतीतून ठाकरे यांनी अनेक खुलासे करताना पुलवामा, मोदी सरकारची दहा वर्ष, निवडणूक आयोग, आमदार अपात्रता प्रकरण, पक्ष फोडणे, मशाल चिन्ह, प्रचाराचे मुद्दे यासारख्या बाबींवर बोट ठेवले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'हे गझमी सरकार' 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत सर्वांधिक हल्लाबोल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. मोदी सरकारचा उल्लेख त्यांनी गझनी सरकार असा केला आहे.  2014 साली ते जे काय बोलले ते त्यांना 2019 साली आठवत नाही. 2019 साली जे काय बोलले ते आता त्यांना आठवत नाही. आज काय बोलतायत ते उद्या आठवणार नाही. अशा शब्दात ठाकरे यांनी मोदी यांना डिवचलं आहे.  

Advertisement

हेही वाचा - पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार खडाजंगी? आमने-सामने मुकाबल्यासाठी काँग्रेस तयार

'10 वर्ष मुर्ख बनवलं' 
  
मोदींना असं वाटतं की, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला म्हणजे जनतेच्याही झाला. पण असं नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहीजे. जनता ही दोन वेळेला म्हणजे 10 वर्षे मूर्ख बनली आहे.  पण ‘तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही, असेही ठाकरे म्हणाले. आता जनता पेटलेली आहे. गेल्या दहा वर्षात ज्या काही भाकडकथा होत्या, त्यात मग शेतकऱयांचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना वगैरे वगैरे या सर्व भूलथापा होत्या हे जनतेच्या लक्षात आले आहे. 

Advertisement

'गद्दारी सहन करणार नाही'

हे करत असताना भ्रष्टाचाऱ्यांना ते एकत्र घेत आहेत. पक्ष फोडत आहेत. ही गद्दारी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रानं गद्दारी कधीच सहन केलेली नाही हे त्यांनी या मुलाखतीत ठासून सांगितले. यावेळी त्यांनी खंडूजी खोपडेंचे उदाहरण दिले. त्यांच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का अजूनही पुसता आला नाही असेही ते म्हणाले. पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे यांची नावे घेतली की हे कट्टर सैनिक म्हणूनच घेतले जातात. 

Advertisement

'हा तर महाराष्ट्राचा घात' 

राज्यात जी गद्दारी झाली ती महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाही असे ठाकरे म्हणाले. जनतेच्या हृदयामध्ये मशाली पेटल्या आहे.  ती एक आग आहे. आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात! कारण बघा, 2014 आणि 2019 ला  मोदी पंतप्रधान झाले. त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले. मोदींना महाराष्ट्राने भरभरून दिलं. त्यानंतर तुम्ही शिवसेनेशी गद्दारी केली. ही केवळ शिवसेनेशी नाही तर महाराष्ट्राशी गद्दारी होती असेही ते म्हणाले.  शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहे. हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्या शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच, पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे असा जोरदार आरोपही त्यांनी केला. 

'उद्योग गुजरातला नेले' 

महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदींनी आपल्या गावाला म्हणजे गुजरातला नेले असा चिमटा ठाकरे यांनी यावेळी काढला.  महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. मुंबईतला हिरे बाजार गुजरातला गेला. आर्थिक केंद्र ही गुजरातला गेले. मेडिकल डिव्हाईस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन ही गुजरातला गेला. यावरही ठाकरे यांनी टिका केली.