जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, पाठिंबा कोणाला दिला?

चौथ्या टप्प्यासाठी मतदान 13 मे ला होत आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. अशा वेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

लोकसभा निवडणूक ऐन रंगात आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान 13 मे ला होत आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. अशा वेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. चौथ्या टप्प्यात ज्या जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे त्याच मतदार संघातील बडे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जैन यांनी निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडणे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का समजला जातोय. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरेंची साथ का सोडली? 

सुरेश जैन यांचे जळगावात मोठे प्रस्थ आहे. जवळपास 34 वर्षे ते आमदार होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पहिल्यादा मंत्री केले होते. मात्र घरकुल घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागला. त्यांना जेलमध्ये जावे लागले. असे असले तरी जळगावच्या राजकारणावर त्यांची पकड कायम होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते ठाकरेंबरोबरच राहीले. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून जैन राजकारणात सक्रीय नव्हते. दरम्यान जैन हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा?

निवडणुकीच्या तोंडावर पाठिंबा कोणाला?   

माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सुरेश जैन जळगावात आले. जळगाव मधील राजकारणातील मोठे नेतृत्व म्हणून माजी मंत्री सुरेश जैन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गिरीश महाजन यांनी देखील सुरेश जैन यांच्याबाबत सूचक विधान केले होते. मात्र आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून माझा सर्व पक्षांना पाठिंबा असल्याचे स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिले आहे. त्यामुळे जैन यांची नक्की भूमिका काय याबाबत संभ्रम कायम आहे.

हेही वाचा - रोहीत पवारांच्या आरोपानंतर मोठी कारवाई, 'त्या' रात्री बँकेत काय घडलं?

34 वर्ष आमदारकी, मंत्रीपद ही भूषवलं 

सुरेश जैन हे 1974 पासून जळगावच्या राजकारणात सक्रीय झाले. 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर गेले. त्यानंतर सलग 34 वर्षे त्यांचा जळगावच्या राजकारणावर दबदबा राहीला आहे. ते 34 वर्षे आमदारही होते. युतीच्या काळात त्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली होती. मात्र पुढे घरकुल घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाला. या आरोपात त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना जवळपास चार वर्षे जेलमध्येही रहावे लागले आहे. जैन यांना मानणारा मोठा वर्ग जळगावमध्ये आहे. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात तेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. 

Advertisement