गोपीचंद पडळकरांना पक्षातूनच विरोध का? बंडखोरी अटळ?

जत मतदार संघातून गोपीचंद पडळकर यांना भाजप उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघात इच्छुक असलेले नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

विधानसभा निवडणूक आता रंगात आली आहे. इच्छुक उमेदवारी मिळण्याची वाट पाहात आहेत. तर काही इच्छुक हे उमेदवारी मिळणार नाही या भिती मुळे पक्षश्रेष्टींच्या गाठीभेटी घेत आहेत. तर काही जण उमेदवारी नाही तर पक्षाचे काम ही नाही असे म्हणत बंडाचा इशाराही देत आहेत. तसाच काहीसा प्रकार सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदार संघात होत आहे. या मतदार संघातून गोपीचंद पडळकर यांना भाजप उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघात इच्छुक असलेले नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे. शिवाय त्यांना उमेदवारी मिळाली तर बंडखोरी अटळ आहे असा इशाराही पक्ष नेतृत्वाला दिला आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या जत मधील उमेदवारी विरोधात जतचे भाजपा नेते एकवटले आहेत. भूमीपुत्राला उमेदवारी द्यावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पडळकर हे भूमीपूत्र नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी जतमधील भाजपा नेत्यांनी थेट मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यात माजी आमदार  विलासराव जगताप हे आघाडीवर होते. त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती सरकारला दणका! निवडणूक आयोगाने 'ते' निर्णय केले रद्द, महामंडळाच्या नियुक्त्यांवरही गाज

  त्यांच्या शिवाय तमनगौडा रवी पाटील हे ही जत मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यांनी ही कोणत्याही स्थिती गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देवू नका अशी मागणी केली आहे. स्थानिक नेत्यालाच उमेदवारी मिळावी असे जगताप यांच्यासह पाटील यांनीही सांगितले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून ही मागणी केली. त्यांच्या बरोबर मतदार संघातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या निमित्ताने शक्तीप्रदर्शनही करण्यात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...

जत विधानसभा मतदार संघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे आमदार या मतदार संघात आहेत. मागिल निवडणुकीत भाजपच्या विलासराव जगताप यांचा पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला टक्कर द्यायची असेल तर स्थानिक उमेदवारच हवा असं या नेत्यांनी फडवीसांना सांगितलं आहे. तसे न झाल्यास पक्षात बंडखोरी ही अटळ आहे असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे.