विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका लागला आहे. मविआचा संपुर्ण पणे धुव्वा उडाला आहे.आघाडीला एकत्र मिळूनही 50 चा आकडा गाठता आला नाही. शरद पवारांची जादू चालली नाही. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली नाही. तर काँग्रेसला आपले गडही राखता आले नाहीत. दिग्गजांना पराभव सहन करावा लागला. पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमीका मांडली. काँग्रेसनेही झालेल्या पराभव स्विकारला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजूनही प्रतिक्रीया दिली नाही. ते माध्यमां समोर अजून का आले नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पवार का बोलले नाहीत हे स्पष्ट केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जितेंद्र आवाह यांनी पहिले लागल्या निकालावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले हा अनपेक्षित निकाल आहे. महाराष्ट्रातली जमीनीवरची परिस्थिती वेगळी होती. पण निकाल वेगळे लागले. आम्ही काहीही बोलत नाही. ईव्हीएमवर लोकांनी बोलावं. ज्या मतदारसंघात लाखोंच्या सभा झाल्या, पण तरीही असा निकाल लागला. विरोधी पक्षाला नगण्य जागा मिळाल्यात. हे इतिहासात कधी झालं नाही असं आव्हाड यावेळी म्हणाले. पैशांचा गैरवापर म्हणजे किती केलाय हे निवडणुकीत दिसून येतं. एका- एका उमेदवाराला 60-70 कोटी रुपये दिल्यावर काय होणार असं आव्हाड यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
निकाला लागल्यानंतर शरद पवार हे माध्यमां समोर आलेले नाहीत. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते अजून काहीच का बोलले नाहीत. यावर आव्हाडांनी स्पष्ट केलं की शरद पवार कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकत घेत आहेत. त्यामुळे त्यांनी अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. असे आव्हाड म्हणाले. प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यां बरोबर शरद पवार हे बोलत आहेत. त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. नक्की काय झाले याचा आढावा घेत आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार आपली भूमीका मांडतील असं शरद पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहावे लागले आहेत. पण त्यांना सध्याच्या स्थिती मिळालेला हा धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. राज्याच्या राजकारणात शरद पवारांचा दबदबा राहीला आहे. पण आता तो नष्ट होतोय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. त्यांना आतापर्यंतच्या सर्वात कमी जागा मिळाल्या आहे. या निवडणुकीत शरद पवारांचे केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला. या निकालाने विरोधत चक्रावून गेले आहेत. उद्धव ठाकरेंना हा निकाल म्हणजे अनाकलनीय आहे असं सांगितलं होतं. यावर आम्हाला विश्वासच बसत नाही असेही ते म्हणाले. मात्र शरद पवार या पराभवावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.