काळे- कोल्हे संघर्षाला पुर्णविराम! कोपरगावमध्ये पहिल्यादाच कोल्हे घराण्याची माघार

या विधानसभा निवडणुकीत काळे घराणे निवडणुकीच्या रिंगणात असेल. महायुतीकडून आशितोष काळे हे मैदानात आहेत. त्यामुळे कोल्हे घराण्याला युतीचा धर्म म्हणून माघार घ्यावी लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोपरगाव:

विधानसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामुळे कोणत्या मतदार संघात कोण असेल हे जवळपास स्पष्ट होत आहे. महायुतीत कोपरगाव हा मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे इथे अजित पवारांनी आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदार संघात काळेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे कोल्हे कुटुंबीयांचा हिरमोड झाला आहे. कोल्हे कुटुंब सध्या भाजपमध्ये आहे. महायुतीचा धर्म म्हणून कोल्हे कुटुंबाला निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही. तशी घोषणाच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी पहिल्यांदाच कोपरगावच्या निवडणूक आखाड्यात कोल्हे - काळे संघर्ष पाहायला मिळणार नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोपरगाव विधानसभा मतदार संघ म्हटला म्हणजे कोल्हे घराणे विरुद्ध काळे घराणे हा संघर्ष समोर येतो. एक पिढीतून दुसऱ्या पिढीत हा संघर्ष होत आला आहे. शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे यांचा संघर्ष या मतदार संघाने पाहिला आहे. मतदारांनी कधी काळे घराण्याला संधी दिली तर कधी कोल्हे घराण्याला कौल दिला. निवडणूक म्हटली म्हणजे ही दोन घराणी आमने सामने उभी ठाकलेली असायची. मात्र त्याला 2024 ची निवडणूक अपवाद ठरणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

या विधानसभा निवडणुकीत काळे घराणे निवडणुकीच्या रिंगणात असेल. महायुतीकडून आशितोष काळे हे मैदानात आहेत. त्यामुळे कोल्हे घराण्याला युतीचा धर्म म्हणून माघार घ्यावी लागली आहे. याबाबत भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एक भावनिक संदेश फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यात त्या म्हणतात आपला तीन पिढ्यांचा ऋणानुबंध असून कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भुमिका असते. आपण भाजपा सोबत एकनिष्ठ असून धोका देवून पुढे जाण्याची भूमिका आपली नाही. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीची पहिली यादी आली, कोणाला उमेदवारी कोणाला वगळलं?

केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी विवेक कोल्हे यांची दखल घेतली आहे. त्या दृष्टीने योग्य पावले पडतील असा कोल्हेंना विश्वास आहे. कोल्हेंच्या भूमिकेमुळे कोपरगावच्या विधानसभेत इतिहासात प्रथमच कोळे विरुद्ध कोल्हे सामना रंगणार नसल्याची चिन्हे आहेत.   भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांची फडणवीस आणि भाजपाच्या केंद्रीय नेत्यासोबत बैठकीतील निघालेला तोडगा अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र फेसबुक पोस्टव्दारे कार्यकर्त्यांना भावीक आवाहान करत त्यांना माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. 

Advertisement