जाहिरात

Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा

Latur Municipal Election 2026:  माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर काँग्रेसने अत्यंत बोचरी टीका केली आहे.

Latur News : लातूरमध्ये 'पोस्टर' धडाका; निलंगेकरांना 'रहमान डकैत'ची उपमा, निवडणुकीआधीच राडा
लातूर:

विष्णू बुरगे आणि सागर जोशी प्रतिनिधी

Latur Municipal Election 2026:  सुरुवातीच्या टप्प्यात शांत वाटणारी लातूर महानगरपालिका निवडणूक आता थेट पोस्टरबाजी आणि वैयक्तिक टीकेवर येऊन ठेपली आहे. माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर काँग्रेसने अत्यंत बोचरी टीका केली असून त्यांची तुलना थेट 'धुरंधर' चित्रपटातील 'रहमान डकैत' या पात्राशी केली आहे. यामुळे लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

रहमान डकैतच्या पोस्टरने वेधले लक्ष

लातूरमध्ये सध्या सोशल मीडियावर एक पोस्टर वेगाने व्हायरल होत आहे. भाजपमध्ये उमेदवारी आणि तिकीट वाटपावरून मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. तिकीट वाटपात अनेकांना डावलण्यात आल्याने नाराज इच्छुकांनी एकत्र येत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप समोर येऊ लागले. 

Latest and Breaking News on NDTV

नेमका हाच धागा पकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांची तुलना रहमान डकैतशी केली आहे. काँग्रेसच्या मीडिया सेलने हे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )

काँग्रेसचा आरोप आणि भाजपाचा पलटवार

भाजपामधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीसाठी झालेले व्यवहार या पार्श्वभूमीवर हे पोस्टर तयार केल्याचे काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. यावर भाजप कडूनही आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. 

भाजपचे सरचिटणीस ज्ञानेश्वर चेवले यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. लातूर हे एक सुसंस्कृत शहर आहे, मात्र अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करून काँग्रेस आपली पैशांची मानसिकता जगासमोर आणत आहे, अशी टीका भाजपने केली आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे.

( नक्की वाचा : Nanded News :'मुस्लीम उमेदवार नको, फक्त हिंदूंचंच पॅनल बनवू'; अशोक चव्हाणांची कथित Audio Clip Viral, ऐका... )

नगर परिषद निवडणुकीतील पराभवाची सल

काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्याला अलीकडेच झालेल्या नगर परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना मोठा धक्का दिला होता. जिल्ह्यातील 4 नगर परिषदांवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले, तर एका ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला. 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून लातूरवर अधिराज्य गाजवणाऱ्या देशमुख कुटुंबाला एकाही जागेवर आपला नगराध्यक्ष बसवता आला नाही. या पराभवानंतर भाजपने मोठा जल्लोष केला होता, जो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे.

नगर परिषद विजयाच्या जल्लोषात निलंगेकर यांनी आता आमचे पुढचे लक्ष लातूर शहर असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसने निलंगेकर यांना आपल्या निशाण्यावर घेतले आहे. 

तिकीट वाटपातील गोंधळाचा फायदा उठवत काँग्रेसने थेट डकैत अशी उपमा दिल्याने आता भाजप याला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलंगेकर स्वतः या टीकेला उत्तर देतात की भाजपचे इतर नेते मैदानात उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com