Latur News : 'नेत्यांनी जागा वाटून घेतल्या, कार्यकर्त्यांनी फाशी घ्यावी का?' लातुरमधील राजकीय वातावरण तापलं!

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युती संदर्भात बैठका झाल्या. या बैठकांमध्ये हाती काहीही लागलं नसलं तरी अहमदपूर तालुक्यापुरती भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचं समोर आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी

Latur News : नुकतीच राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या युती संदर्भात बैठका झाल्या. या बैठकांमध्ये हाती काहीही लागलं नसलं तरी अहमदपूर तालुक्यापुरती भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचं समोर आलं आहे. 

अहमदपूर तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सहा जणांसाठी युती होऊन दोन्ही पक्षांनी तीन-तीन जागा वाटून घेतल्या आहेत. हाडोळती खंडाळी आणि किनगाव हे तीन गट भाजपकडे तर शिरूर अंधोरी आणि रोकडा सावरगाव हे तीन गट राष्ट्रवादीकडे गेल्याने कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली आहे. अनेक जण राष्ट्रवादीकडून तयारी करत होते. तर अनेक जण भाजपकडून तयारीला लागले होते. मात्र या युतीमुळे सर्व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शिवानंद हिंगणे आणि तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. 

नक्की वाचा - Akola News : अकोल्यात भाजप उमेदवाराला MIM–काँग्रेसचा पाठिंबा? छुप्या युतीची पुन्हा जोरदार चर्चा

'मग आम्ही काय फाशी घ्यायची'; कार्यकर्त्यांचा संताप

सुरुवातीपासून कार्यकर्ते कामाला लागले होते. ही निवडणूकच मुळात कार्यकर्त्यांची, त्यामुळे आमचा नेत्यांवर विश्वास होता. मात्र नेत्यांनी नातेवाईकांना रिंगणात उतरवून निवडून आणण्यासाठी ही युती केल्याने आमच्यावर अन्याय झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तर याच बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी नेत्यांनी मतदारसंघ वाटून घेतले. बाबासाहेब पाटलांनी शिरूर घेतला. देशमुखांनी हाडोळती घेतलं. केंद्रेंनी किनगाव घेतलं. मग कार्यकर्त्यांनी जायचं कुठं असं सवाल उपस्थित केला. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये तयारी केलेले कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आम्ही ठेवलेला विश्वास पार संपला आहे, मग आम्ही काय फाशी घ्यायची का असं सवाल उपस्थित केला आहे. तर या सगळ्या घडामोडीनंतर लातूर महानगरपालिकेमध्ये बंडखोरांमुळे भाजपला जो फटका बसला तोच फटका जिल्हा परिषदेचे निवडणुकीत अहमदपूर आपल्या सहा जागांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसेल का अशा चर्चांना आता उधाण आल्याचा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडी करून आज प्रचाराला सुरुवात करत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या निकालाची परंपरा जिल्हा परिषदेसाठी अहमदपूर तालुक्यातही कायम राहील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article