जाहिरात

Latur ZP Election Result: लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची मुसंडी, पण सत्तेपासून दुर राहणार, कारण...

दुसरीकडे लातूरमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने आपले खाते उघडले आहे.

Latur ZP Election Result: लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची मुसंडी, पण सत्तेपासून दुर राहणार, कारण...
  • लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे
  • काँग्रेसला बहुमतासाठी सहा जागा कमी पडल्याने त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे
  • भाजपने १८ आणि राष्ट्रवादीने १२ जागा मिळवून एकत्रितपणे लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचा ही निकाल जाहीर झाला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल आज सोमवारी लागला. लातूर महापालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यामुळे काँग्रेस नेते अमित देशमुख यांचा उत्साह वाढला होता. महापालिकेनंतर जिल्हा परिषद ही ताब्यात घेण्यासाठी त्यांनी ताकद लावली होती. पण त्यांचे प्रयत्न थोडक्या कमी पडले. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरून ही काँग्रेसला जिल्हा परिषदेत विरोधी पक्षात बसावे लागणार आहे.   

लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसने सर्वाधिक 23 जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासाठी सहा जागा कमी पडल्या आहेत. मागिल निवडणुकीत काँग्रेसला फक्त 15 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत ही कामगिरी सुधारली आहे. सत्तेच्या जवळ जावून ही सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश मिळालं नाही. या ठिकाणी भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. तर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी मिळून लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू शकतात. 

नक्की वाचा - घराणेशाहीचा विजय असो! 'या' नेत्यांच्या नातेवाईकांची जिल्हा परिषदेत एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट

काँग्रेसनंतर भाजपला लातूर जिल्हा परिषदेत 18 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीच्या पारड्यात 12 जागा पडल्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस लातूरमध्ये किंगमेकर ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला ही एक जागा जिंकता आली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. ठाकरे आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य सोबत घेते तरी काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. 

नक्की वाचा - Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषदेत भाजपच पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी कोण?

दुसरीकडे लातूरमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने आपले खाते उघडले आहे. मनसेचा एक उमेदवार जिल्हा परिषदेत विजयी झाला आहे. तर दोन अपक्ष ही विजयी झाले आहेत. त्यामुळे अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात एक हाती लढत दिली. पण थोडक्यात सत्तेने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली जिल्हा परिषद भाजप- राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कोल्हापूरमध्ये ही काँग्रेसने चांगली कामगिरी केली. पण त्यांना सत्तेचे सोपान चढता आले नाही. 

लातूर जिल्हा परिषद निकाल  

  • काँग्रेस-23
  • भाजप - 18
  • शिवसेना-01
  • राष्ट्रवादी-12
  • ठाकरे गट-01
  • शरद पवार गट -01
  • मनसे -01 
  • अपक्ष -02
  • एकूण = 59

Listen to the latest songs, only on JioSaavn.com