जाहिरात
2 minutes ago

Zilla Parishad Election Result LIVE: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असणाऱ्या 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2 हजार 624 उमेदवार रिंगणात आहेत. 
 

Zilla Parishad Election Result LIVE: सिंधुदुर्ग पंचायत समिती भाजपची मुसंडी

सिंधुदुर्ग पंचायत समितीमध्ये भाजपने मुसंडी मारली, तब्बल 12 सदस्य विजयी झाले आहेत यापूर्वी 17 सदस्य  बिनविरोध आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात पंचायत समितीमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.

Solapur ZP Election Result 2026: BJP's Sanskruti Satpute Defeats Jivan Jankar; Mohite-Patil Family Faces Setback in Malshiras

Solpaur ZP Result News: माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Zilla Parishad Election Result LIVE: भाजपचे बंडखोर मायकल डिसुझा 250 मतांनी विजयी

  • सिंधुदुर्ग: सावंतवाडी कोलगाव जिल्हा परिषद गटामधील हायव्होल्टेज लढतीत भाजपचे बंडखोर मायकल डिसुझा 250 मतांनी विजयी
  • भाजपचे उमेदवार जिल्हा बँक संचालक महेश सारंग पराभूत
  • सावंतवाडीत धक्कादायक निकाल

Zilla Parishad Election Result LIVE: भाजपचे उमेदवार शरद बसवंत विजयी

सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार शरद बसवंत 4 हजार 277 मतांनी विजयी

Zilla Parishad Election Result LIVE:पंढरपूर: माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा मोठा जल्लोष

पंढरपूर: माळशिरसमध्ये राम सातपुते यांचा मोठा जल्लोष 

मोहिते पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटून राम सातपुते यांनी उधळला गुलाल 

भाजपाचा सुपडा साफ करणारा अवलाद अजून जन्माला यायचाय, सातपुते यांची मोहिते पाटलांवर घणाघाती टीका

Zilla Parishad Election Result LIVE: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार गणेश मुळे विजयी

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील खंडाळी गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार गणेश मुळे विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: विजय मिळाल्यानंतर भाजप उमेदवार भावुक

Zilla Parishad Election Result LIVE: माळशिरसच्या दहिगाव गणातून निवडून आल्यावर भाजपच्या तनुजा खिलारे यांना अश्रू अनावर

Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Dharashiv | परांडा मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांचा जल्लोष

Zilla Parishad Election Result LIVE: ठाकरे गटाचे अमर समुद्रे 1 मताने विजयी

ढोकी पंचायत समितीतून ठाकरे गटाचे अमर समुद्रे 1 मताने विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर विजयी

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा, काँग्रेस 12 जागा, भाजप 7 जागा,  शिवसेना 6 जागांवर

Zilla Parishad Election Result LIVE: भाजपचे प्रसाद ढासळकर विजयी

 

परभणी : चिकलठाणा जिल्हा परिषद येथून भाजपचे प्रसाद ढासळकर विजयी ,पुरुषोत्तम पावडे यांचा पराभव केला

Zilla Parishad Election Result LIVE: शिवसेनेच्या (शिंदे गट) सुचिता आनंद भरोसे विजयी

परभणी बोबडे टाकळी, शिवसेनेच्या (शिंदे गट) सुचिता आनंद भरोसे विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: अलिबाग आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवार विजयी

अलिबाग आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवार विजयी, रसिका केणी विजयी.

Zilla Parishad Election Result LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी खेत्रे यांचा विजय

बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विजय, उमेदवार पल्लवी खेत्रे विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: रायगड : विकास गोगावले 2,420 मतांनी आघाडीवर

रायगड : विकास गोगावले 2,420 मतांनी आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: भाजपचे दीपक वैद्य 10 हजार मतांनी विजयी

भाजपचे दीपक वैद्य 10 हजार मतांनी विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: शिवराज भुमरे आघाडीवर

पैठण /  छत्रपती संभाजीनगर :पाचोड जिल्हा परिषद गटातून  खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पहिल्या फेरीत 354 मताने आघाडीवर.

Zilla Parishad Election Result LIVE: मायकल डिसुझा आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE:  सिंधुदुर्ग-कोलगाव जिल्हा परिषदेतून मायकल डिसुझा आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: पुणे टाकळी हाजी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी

पुणे टाकळी हाजी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: पुणे : मावळ जिल्हा परिषदेच्या 5 जागी राष्ट्रवादी आघाडीवर

पुणे : मावळ जिल्हा परिषदेच्या 5 जागी राष्ट्रवादी आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: साताऱ्यातून अरुण गोरे पिछाडीवर

साताऱ्यात जयकुमार गोरे यांचे बंधू पिछाडीवर

कुकडवाड गटातून अरुण गोरे 300 मतांनी पिछाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: रायगड-भेंडखळ पंचायत समितीत ठाकरे गट विजयी

रायगड-भेंडखळ पंचायत समितीत ठाकरे गट विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: सावंतवाडी जिल्हा परिषद, पंचायत समितीत अपक्ष उमेदवारांची बाजी

सावंतवाडी जिल्हा परिषद, पंचायत समितीत अपक्ष उमेदवारांची बाजी

Zilla Parishad Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटात शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटात शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: फुलंब्री: वडोद बाजार गटात शिवसेना आघाडीवर

फुलंब्री: वडोद बाजार गटात शिवसेना आघाडीवर

वडोद बाजार गटात मंगेश साबळे आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: म्हसळामधील जिल्हा परिषद पाभरे गट राष्ट्रवादी (अजित पवार) अनिल बसवत विजयी

रायगड : म्हसळा तालुक्यात

पाभरे पंचायत समिती गण 

समृद्धी चाचले : NCP 3078 विजयी

अमिता जाधव : शिंदे गट 1258 विजयी

गिजे ज्योती : शेकाप 1443 विजयी

म्हसळामधील जिल्हा परिषद पाभरे गट राष्ट्रवादी (अजित पवार) अनिल बसवत विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: रत्नागिरीमध्ये 8 जागांवार शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा जागांपैकी 8 जागांवर शिंदे शिवसेना आघाडीवर तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगर: अजिंठा गणाच्या उमेदवार रजीनाबेगम अब्दुल समद विजयी

छत्रपती संभाजीनगर:

अजिंठा गणाच्या उमेदवार रजीनाबेगम अब्दुल समद विजयी

हळदा गणाच्या उमेदवार कासाबाई पांडुरंग गवळे विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: रायगड: शहापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून भाजपच्या शांभवी कल्याणशेट्टी आघाडीवर

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी आघाडीवर 

Zilla Parishad Election Result LIVE: कराड येथील मतमोजणी केंद्रावर मोबाइल नेणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडलं

Zilla Parishad Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगर शिवसेनेच्या आयेशा बेगम विजयी

  • छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथून शिंदेसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती दोन सदस्य विजयी
  • अजिंठा गटात शिवसेनेचा पहिला विजय, उमेदवार आयेशा बेगम विजयी 

Zilla Parishad Election Result LIVE: सांगोला तालुक्यातून महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने खाते उघडले

सांगोला तालुक्यातून महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे विजयी 

 

Zilla Parishad Election Result LIVE: म्हसळा पंचायत समितीत खरसई : राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू म्हात्रे विजयी

रायगड पंचायत समिती पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने

म्हसळा पंचायत समितीत खरसई : राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू म्हात्रे विजयी

रमेश खोत UBT 1220

पाटील महेश शिंदे गट 1668

लहू म्हात्रे राष्ट्रवादी 2778

नोटा 138

Zilla Parishad Election Result LIVE: शिंदे शिवसेनेचे महेंद्र मांडवकर 300 मतांनी आघाडीवर

रत्नागिरीत पावस जिल्हा परिषद : शिंदे शिवसेनेचे महेंद्र मांडवकर 300 मतांनी आघाडीवर

रत्नागिरीत दोन अपक्ष उमेदवार पहिल्या आघाडीवर: गोळप जिल्हा परिषद गटातून उदय बने तर हातखंबा गटातून पर्शुराम कदम आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: वैजापूर तालुक्यात शिवसेनेचे (उबाठा) 4 उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर

वैजापूर तालुक्यात शिवसेनेचे (उबाठा) 4 उमेदवार आघाडीवर 

कल्याण गायके

संजय निकम 

पद्मबाई शिंदे 

कल्याणी मिसाळ  

Zilla Parishad Election Result LIVE: खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर 

खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत विहामांडावा गटातील राष्ट्रवादी पक्षाचे विनोद तांबे आघाडीवर 

ढोरकिन येथे राष्ट्रवादी संजय वाघचौरे यांच्या पत्नी आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

63 / 11

भाजप : 04

शिवसेना : 02

शिवसेना UBT: 04

NCP :  01

काँग्रेस : 00

वंचित : 00

MIM : 00

अपक्ष :00

Zilla Parishad Election Result LIVE: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते

पंढरपूर 

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते

माढा तालुक्यातील भोसरे गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवी विजयी 

भोसरे गट आणि गणातील सर्व जागा राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 

छायदेव कारंडे आणि राहुल आखाडे पंचायत समितीत विजयी

Zilla Parishad Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक पक्षनिहाय आघाडी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

63 / 8 

भाजप :  04

शिवसेना :  02

शिवसेना UBT: 01

NCP :  01

काँग्रेस :  00

वंचित : 00

MIM: 00

अपक्ष :00

Zilla Parishad Election Result LIVE: मंगळवेढा तालुक्यातील दामाजीनगर गटातून भाजपचे रमेश भांजे आघाडीवर

पंढरपूर :

मंगळवेढा तालुक्यातील दामाजीनगर गटातून भाजपचे रमेश भांजे आघाडीवर

सांगोल्यात महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे आघाडीवर 

शहाजीबापू पाटील यांचे मूळ गाव असणाऱ्या महूद येथून शिवसेना (शिंदे गट) लवटे आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद निवडणूक, मतमोजणीला सुरुवात: कोण गुलाल उधळणार?

Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026: Full List Of 12 ZP And 125 Panchayat Samitis

Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026: राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत सममित्यांच्या निवडणुकीची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी केली होती.

Zilla Parishad Election Result LIVE: लातूरमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर

लातूरमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर 

Zilla Parishad Election Result LIVE: परभणी पेडगाव येथून काँग्रेस आघाडीवर

परभणी

पेडगाव येथून काँग्रेस आघाडीवर

टाकळी कुंभकर्ण येथून शिवसेना (उबाठा) आघाडीवर

पिंगळी सर्कल शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ

  • धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ 
  • राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ 
  • उमेदवार प्रतिनिधीलाही आतमध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप 
  • तासाभरापासून गेटवरच अडवले असल्याचा आरोप
  • प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत, उमेदवाराच्या प्रतिनिधींचा आरोप 
  • आम्हाला गेटवर ठेवूनच सत्ताधारी पक्षाकडून निकाल लावायचा आहे का? संतप्त सवाल 

Zilla Parishad Election Result LIVE: पंढरपूर : पहिला कल भाजपाच्या संस्कृती राम सातपुते यांच्या बाजूने

  • जिल्हा परिषद निवडणूक 
  • पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील दहिगाव पोस्टल मतमोजणी सुरुवात
  • पोस्टल मतांचे पहिले काही कौल भाजपाच्या संस्कृती राम सातपुते यांच्या बाजूने 
  • राष्ट्रवादीचे जीवन उत्तम जानकर पिछाडीवर

Zilla Parishad Election Result LIVE: मतमोजणी केंद्रावर मोबाइल नेणाऱ्याला कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडलं

  • कराडला पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्याचे ओळखपत्र काढून घेतले 
  • मतमोजणी केंद्रावर कर्मचारी मोबाइल लपवून नेत असल्याची माहिती समोर
  • कर्मचारी रेनकोटमध्ये मोबाइल लपवून नेत होता, पोलिसांना त्याला पकडलं
  • कर्मचाऱ्याला मतमोजणी केंद्राबाहेर काढलं 

Zilla Parishad Election Result LIVE: मतमोजणी केंद्रावर मोबाइल नेणाऱ्याला कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडलं

  • कराडला पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्याचे ओळखपत्र काढून घेतले 
  • मतमोजणी केंद्रावर कर्मचारी मोबाइल लपवून नेत असल्याची माहिती समोर
  • कर्मचारी रेनकोटमध्ये मोबाइल लपवून नेत होता, पोलिसांना त्याला पकडलं
  • कर्मचाऱ्याला मतमोजणी केंद्राबाहेर काढलं 

Zilla Parishad Election Result LIVE: मतमोजणीला सुरुवात

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आज निकाल
  • मतमोजणीला सुरुवात

Zilla Parishad Election Result LIVE: विजय वडेट्टीवार निकालानंतर साधणार संवाद

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधणार 

Zilla Parishad Election Result LIVE: साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या 65 जागा तर पंचायत समितीच्या 130 जागांसाठी मतमोजणी

साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या 65 जागा तर पंचायत समितीच्या 130 जागांसाठी मतमोजणी 

Zilla Parishad Election Result LIVE: कोल्हापुरात 74.45 टक्के मतदान झाले होते

  • कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. 
  • कोल्हापुरात 74.45 टक्के मतदान झाले होते.

Zilla Parishad Election Result LIVE: भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी 2017मधील पक्षीय बलाबल शेअर केले

Zilla Parishad Election Result LIVE: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाची सत्ता येणार?

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 42 जागा तर पंचायत समितीच्या एकूण 83 जागांसाठी आज मतमोजणी होतेय. 
  • पण 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 17 पंचायत समिती मतदारसंघ अशा 25 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 
  • उर्वरित 125 जागांसाठीच आज मतमोजणी प्रक्रिया होत आहे. 

Zilla Parishad Election Result LIVE: EVM स्ट्राँग रूमबाहेर नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल

- सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूमबाहेर आढळल्याचे प्रकरण 

- परवानगी शिवाय ईव्हीएम असलेले वाहन स्ट्राँग रूम बाहेर नेल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल 

- वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय 

- वाहनात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असूनही परस्पर स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

- निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी ते वाहन परत मागवले असताना ते परत नेण्यास टाळाटाळ केली

- ईव्हीएम धाब्याबाहेर गाडीत राहिल्याने लोकांची लोकांचा जमाव जमून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला 

- बीएनएस कलम 222, 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

- निवडणुकीत सेवेत क्षेत्रीय अधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी याबाबत फिर्याद दिलीय

Zilla Parishad Election Result LIVE: रायगडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त

  • रायगड जिल्हा परिषद मतमोजणी प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त
  • विशेषतः महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादानंतर महाडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष लक्ष देण्यात आलंय
  • रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप युती असा थेट सामना झाला 

Latur Zilla Parishad Election Result LIVE: लातूरमध्ये कोण मारणार बाजी?

Latur Zilla Parishad Election Result LIVE: परभणीमध्ये जिल्हा परिषदेत 54 गट तर पंचायत समितीचे 108 गण आहेत. 

परभणी जिल्हा परिषदेवर प्रामुख्याने नेहमी राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिलेला आहे. 

भाजपने प्रचंड परिश्रम घेतले आहेत. 

झेडपीसाठी 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालंय 

Latur Zilla Parishad Election Result LIVE: लातूरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • Latur Zilla Parishad Election Result LIVE: लातूरमधील जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या 118 जागांसाठी किल्ला परिसरात मतमोजणी होणार आहे 
  • या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपचा थेट सामना पाहायला मिळालाय
  • माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय 

Zilla Parishad Election Result LIVE: कोण होणार सोलापूरचा कारभारी?

  • सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आज कारभारी ठरणार 
  • जिल्ह्यात 16 लाख 20 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
  • 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मताचा टक्का घसरलाय

Zilla Parishad Election Result LIVE: धारशिवमध्ये जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल

धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांचे सर्व अपडेट्स पाहा LIVE

Zilla Parishad Election Result LIVE: पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

छत्रपती संभाजीनगरमधील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात 

Zilla Parishad Election Result LIVE: विजयी उमेदवारांना पोलिसांचे आवाहन

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतमोजणीनंतर निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना आचारसंहितेमुळे मिरवणूक काढण्यास प्रतिबंध केला आहे. 
  • जल्लोष करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Zilla Parishad Election Result LIVE: रत्नागिरीमध्ये बहुमताचा कौल कोणाला मिळणार?

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर बहुमताचा कौल कुणाला मिळणार याचा फैसला आज होणार आहे.  जिल्हा परिषदेत युती आपला गड कायम राखणार की विरोधी पक्ष सत्तेचे गणित सोडविण्या योग्य आकडा प्राप्त करणार याची उत्सुकता आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे 56 गटांसाठी 151 उमेदवार रिंगणात

112 पंचायत समिती गण - 321 उमेदवार रिंगणात

एकूण मतदान - 55.79 टक्के

एकूण मतदार - 11, 73, 899

जिल्हा परिषदेत कोणता पक्ष किती जागांवर लढत आहे?

जागा - 56

शिवसेना शिंदे - 49

भाजप -  10

राष्ट्रवादी अजित पवार - 16

शिवसेना (ठाकरे) - 43

राष्ट्रवादी (शरद पवार) - 1

काँग्रेस -  2

मनसे - 1

Zilla Parishad Election Result LIVE: सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Zilla Parishad Election Result LIVE: 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 68.28 टक्के मतदान

12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये सरासरी 68.28 टक्के मतदान झाले.

Zilla Parishad Election Result LIVE: कोणाला मिळणार सत्ता?

जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2624 उमेदवार रिंगणात आहेत. 

पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी 4814 उमेदवार रिंगणार आहेत.

Panchayat Samiti Result: पंचायत समिती निवडणुकांचेही निकाल

Panchayat Samiti Result: 125 पंचायत समिती निवडणुकांचेही आज निकाल लागणार आहेत.

Zilla Parishad Election Result LIVE: 12 जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल

Zilla Parishad Election Result LIVE: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com