विधानसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहेत. पण त्यात अनेक लढती ह्या कुटुंबा कुटुंबात किंवा नात्यात होत असल्याचेही समोर आले आहे. कुठे बापा विरुद्ध लेक, तर कुठे भावा विरोधात भाव अशा लढती दिसत आहेत. अशीच एक चर्चेतील लढत होत होती ती म्हणजे लोहा विधानसभा मतदार संघातील लढत. लोहा विधानसभा मतदार संघात पती विरोधात पत्नी मैदानात उतरले होते. पण पाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीसाठी असं काही गिफ्ट दिलं ज्याची चर्चा आता जोरदार होत आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण पाहाता नातं खरोखर असंही असतं का? असं ही बोललं जातय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदार संघा सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणी पती विरुद्ध पत्नी यांच्या लढतीची. या मतदार संघात शामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्याच वेळी त्यांची पत्नी आशा शिंदे यांनीही उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे पती विरोधात पत्नी असे चित्र निर्णाण झाले होते. घरात एकमेकाला विरोध असं ही बोललं जात होतं. त्यामुळे कोण माघार घेणार का? याचीही चर्चा मतदार संघात होत होती. उमेदवारी अर्ज चार तारखेला मागे घेतले जाणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी पतीने मात्र पत्नीला एक आनंदाचा धक्का दिला आहे. तो ही पाडव्याच्या मुहूर्तावर. दिवाळी पाडव्याला पती कडून पत्नीला काही तरी भेट देण्याची परंपरा आहे. पत्नीला ही या भेटीची प्रतिक्षा असते. अशा वेळी शामसुंदर शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेत पत्नीसा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांची पत्नी आता शेतकरी कामगार पक्षाची अधिकृत उमेदवार असणार आहे. पतीने दिलेल्या या अनोख्या भेटी मुळे आशा शिंदे ही खुश झाल्या आहेत. शिवाय घर हे एकच आहे. घरात कोणतेही वाद नाहीत हे ही शिंदे यांनी या कृतीतून दाखवून दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?
लोहा विधानसभा मतदार संघातून भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी खासदार असलेल्या चिखलीकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे या त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एकीकडे पतीन माघार घेतली असली तरी दुसरीकडे मात्र भावा विरोधात बहीण असा सामना रंगणार आहेत. लोहा विधानसभा मतदार संघातून मागिल निवडणुकीत शामसुंदर शिंदे यांनी बाजी मारली होती. आता त्यांनी माघार घेत पत्नीचा मार्ग मोकळा केला आहे.