उत्तर महाराष्ट्रात वारं फिरलं! महाविकास आघाडीची मोठी मुसंडी

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, शिर्डी यागा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अहमदनगर, जळगाव, रावेर या ठिकाणी महायुतीचे उमेदवारी आघाडीवाल आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडीने मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार महायुती 3 जागांवर तर महाविकास आघाडी 5 जागांवर आघाडी घेतली आहे. नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, शिर्डी यागा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अहमदनगर, जळगाव, रावेर या ठिकाणी महायुतीचे उमेदवारी आघाडीवाल आहे. 

मतदारसंघनिहाय कोणते उमेदवारी आघाडीवर? 

नाशिक मतदारसंघ

राजाभाऊ वाजे - ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर 
हेमंत गोडसे - शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर

(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)

दिंडोरी मतदारसंघ 

भास्कर भगरे - शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर 
डॉ. भारती पवार - भाजप पिछाडीवर

अहमदनगर मतदारसंघ

सुजय विखे - भाजप आघाडीवर
निलेश लंके - शरद पवार गट पिछाडीवर

(नक्की वाचा- महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे?)

धुळे मतदारसंघ

डॉ. सुभाष भामरे - भाजप पिछाडीवर
शोभा बच्छाव - काँग्रेस आघाडीवर

जळगाव मतदारसंघ

स्मिता वाघ - भाजप आघाडीवर
करण पवार - ठाकरे गट शिवसेना पिछाडीवर

रावेर मतदारसंघ

रक्षा खडसे - भाजप आघाडीवर 
श्रीराम पाटील - राष्ट्रवादी शरद पवार गट पिछाडीवर

(नक्की वाचा - Mumbai LIVE Election Results 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर)

नंदुरबार मतदारसंघ

गोवाल पाडवी - काँग्रेस आघाडीवर
डॉ. हिना गावीत - भाजप पिछाडीवर

शिर्डी मतदारसंघ

भाऊसाहेब वाकचौरे - शिवसेना ठाकरे गट आघाडीवर 
सदाशिव लोखंडे - शिवसेना शिंदे गट पिछाडीवर