जेलमधून निवडणूक जिंकणारा खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग कोण आहे?

Who is Amritpal Singh : पंजाबमधील या निकालात सर्वात जास्त चर्चा ही खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या विजयाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग जेलमध्ये राहूनही निवडणुकीत विजयी झाला आहे.
मुंबई:


लोकसभा निवडणुकांचे अनेक निकाल (Loksabha Election Result) आश्चर्यकारक आहेत. अनेक दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर ज्यांची कुणाला अपेक्षा नव्हती असे अपक्ष उमेदवार निवडून आलेत. पंजाबमधील निवडणुकींचे निकालही अनेकांना अचंबित करणारे आहेत. राज्यातील 13 पैकी 7 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. आम आदमी पक्ष 3 ठिकाणी विजयी झालाय. शिरोमणी अकाली दल 1 तर अपक्ष दोन ठिकाणी विजयी झाले आहेत. तर, भाजपाचा पंजाबमधून सुपडा साफ झालाय. पंजाबमधील या निकालात सर्वात जास्त चर्चा ही खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या  (Amritpal Singh)  विजयाची आहे. या विजयानंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा विघटनवादाची बीजं रुजली जात आहेत का? ही भीती निर्माण झालीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग फक्त खलिस्तानी समर्थक नाही. तर, त्याच्यावर देशद्रोहाचाही आरोप आहे. तो सध्या आसामधील दिब्रूगडच्या जेलमध्ये बंद आहे. अमृतपालच्या विरोधात NSA सह 16 केसेस आहेत. पंजाब पोलिसांनी त्याला मागच्यावर्षी एप्रिलमध्ये भिंद्रावालेचे दाव रोडेमधून अटक केली होती.

Advertisement

अमृतपालनं खडूर साहिब मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्याला 404430 मतं मिळाली. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मतदारसंघात एकदाही पाय न ठेवता त्यानं 197120 मतांनी विजय मिळवला. खडूस साहिबची जागा शिखांसाठी खास मानली जाते. येथील गुरुद्वारा अत्यंत पवित्र मानला जातो. गुरुनानक इथं जवळपास 5 वेळा आले होते, असं सांगितलं जातं. या मतदारसंघात अमृतपालचा विजय त्यामुळेच अधिक लक्षवेधी आहे.

Advertisement

( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )
 

अमृतपालला सिमरनजीत सिंहचा पक्ष शिरोमणी अकाली दलचा पाठिंबा आहे. अमृतपालनं जेलमधून निवडणूक लढवली. त्याच्या समर्थकांनी त्याचा प्रचार केला. तो जेलमधूनच विजयी झाला. प्रचाराच्या दरम्यान धर्मोपदेशकाच्या वेशात तलवार आणि बुलेटप्रूफ अंगरखा लावलेले त्याचे पोस्टर्स लावण्यात आली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण पंजाबमधून नागरिक आल्याचा दावा अमृतपालच्या वडिलांनी केला. पंजाबला ड्रग्जच्या तावडीतून सोडवणे, माजी शिख दहशतवाद्यांची जेलमधून सुटका करणे आणि देशभरात पंजाबी ओळख जपणे हे त्याच्या प्रचारातील मुख्य मुद्दे होते.

Advertisement