लोकसभेच्या सहा टप्प्यानंतर भाजप की विरोधक कोणाचे पारडे जड?

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे सहा टप्पे पुर्ण झाले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. अशा स्थितीत देशाचा मुड काय आहे याबाबत 4 तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

जाहिरात
Read Time: 4 mins
नवी दिल्ली:

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक निकालाबाबत वेगवेगळे दावे राजकीय राजकीय पक्ष करत आहेत. एनडीटीव्हीच्या बॅटलग्राऊंड शोमध्ये राजकीय विश्लेषकांनीही आपले मत मांडले आहेत. त्यांच्या नुसार या निवडणुकीत जनतेचा मुड काय आहे हे ओळखणे कठीण आहे. भाजपला उत्तरेतीला त्यांच्या गडात तगडी लढत मिळत आहे. मात्र तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपला फायदा होताना दिसत आहे. एनडीटीव्हीच्या बॅटलग्राऊंड या कार्यक्रमात एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांनी सुत्रसंचलन करत लोकसभेचे निकाल काय असू शकतात याबाबत मते जाणून घेतली. 

ही निवडणूक गुंतागुंतीची - नीरजा चौधरी 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही लाट दिसत नाही. असे असले तरी जनतेमध्येही सरकार विरोधात रागही दिसला नाही असे मत जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात ज्या निवडणुका झाल्या तशी ही निवडणूक निश्चितच नाही. सरकार विरोधात असंतोष नाही अशातला भाग नाही. काही काही ठिकाणी निश्चितच असंतोष आहे. मात्र त्याचा विरोधकांना फायदा घेता आला नाही असेही त्या म्हणाल्या. ही निवडणूक अतिशय गुंतागुंतीची आहे. ही निवडणूक समजणे अवघड आहे. मोदी लाट दिसत नाही. विरोधकांकडे स्थानिक मुद्दे आहेत. या मुद्द्यांसह विरोधक लढत आहेत पण ते मुद्दे त्यांनी विजयापर्यंत घेऊन जातील असे वाटत नसल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

दोन वर्ग निकाल निश्चित करतील - अमिताभ तिवारी 

राजकीय रणनीतिकार अमिताभ तिवारी यांनी सांगितलं की निवडणुकीनंतर कोणती लाट आहे हे समजत आहे. मतदान करणे हा भावनात्मक निर्णय आहे गेल्या वेळी पाहीलं तर भाजपला 40 टक्के मते मिळाली होती. यावेळी मात्र लोकांमध्ये असंतोष आहे. पण या असंतोषाला सरकार विरोधातील रागात परावर्तीत करण्याचे काम महत्वाचे आहे. त्यामुळे ते मतदान विरोधकांना मतदान करतील का हे ओळखणे अवघड आहे.  सोशल मीडियावरील चर्चा बाजूला सोडल्या तर एक असा सायलेंट मतदाता आहे जो निवडणूक होण्या आधीच आपण कोणाला मतदान करायचे आहे हे निश्चित करत असतो. तिवारी यांना विचारण्यात आले की विरोधक सोशल मीडियावर निर्माण केलेल्या भ्रमात भटकले आहेत का? त्याला उत्तर देताना तिवारी म्हणाले की याची अधिक शक्यता आहे. लोक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करत असतात. शिवाय सोशल मीडियावर जी चर्चा आहे त्यातून दोन प्रमुख वर्ग गायब आहे. एक महिला आणि दुसरा कल्याणकारी योजनांचे लाभार्थी. हेच दोन वर्ग आहेत ज्यांनी नुकत्याच झालेल्या काही निवडणुकांची दिशा निश्चित केली आहे असेही ते म्हणाले. 

Advertisement

जागा किती जिंकणार याचीच अधिक चर्चा - संजय कुमार 

या निवडणुकीत भाजप जिंकणार की हारणार याची चर्चा होत नाही. तर चर्चा या गोष्टीची होते की भाजपला 272 जागांच्या आता रोखलं जाईल की नाही? असे स्पष्ट मत  निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांनी व्यक्त केले. सध्या चर्चा काय होते तर भाजपला 370 नाही तर 300 च्या आसपास जागा मिळतील. भाजपला नुकसान झाले तर किती नुकसान होईल हे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. ही निवडणूक काही मुद्द्यांच्या आधारावर सुरू झाली. मात्र त्यानंतर त्याची दिशा भटकली. भाजपने राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रीय केले होते. मात्र त्यानंतर संविधान बदलले जाणार हा मुद्दा विरोधकांनी घेतला. काँग्रेसने हा अजेंडा सेट केला. त्यालाच प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला द्यावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक एका मुद्द्यावर सुरू झाली आणि ती दुसऱ्याच बाजूने वाहात गेली असे चित्र दिसले.   
 

Advertisement

दोन राज्यांची भूमिका महत्वाची - संदीप शास्त्री

राष्ट्रीय स्तरावर सध्या कोणतीही लाट नाही. मात्र राज्याराज्यांमध्ये छोट्या- छोट्या लाटा दिसत आहेत. काही ठिकाणी हवा जोरात आहे तर काही ठिकाणी हळू आहे. असे स्पष्ट मत राजकीय विश्लेषक संदीप शास्त्री यांनी व्यक्त केले. प्रत्येक राज्यात वेगळा निकाल लागेल. त्यामुळे राज्यांवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रीया ही फार काळ लांबवली गेली. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही एक थकवा आलेला पाहायला मिळाला. पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात जवळपास सहा आठवड्याचा कालावधी होता. त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होतो तेही पहावं लागणार आहे. भाजप 304 जागांच्या वर जाणार की खाली येणार हे दोन राज्य ठरवतील असेही ते म्हणाले. त्यात एक महाराष्ट्र आणि दुसरे पश्चिम बंगाल हे राज्य असेल. महाराष्ट्रात भाजपला त्यांच्या मित्रपक्षच अडचणीचे ठरत आहेत. तर बंगाल भाजपसाठी महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. 

Topics mentioned in this article