लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरु आहे. या मतदानासाठी काही ठिकाणी लांब रांगा लागल्या असून काही भागात दुपारपर्यंत संथ गतीनं मतदान झालंय. गुजरातमधील नडियादमध्ये मतदाराची जबरी इच्छाशक्ती दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. या तरुण मतदाराला दोन्ही हात नाहीत. त्यानंतरही त्यानं पायाचा वापर करुन मतदान केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंकित सोनी असं या मतदाराचं नाव आहे. दोन दशकांपूर्वी वीजेचा धक्का बसून झालेल्या अपघातामध्ये त्याचे दोन्ही हात निकामी झाले. या अपघातानंतर खचून न जाता तो जिद्दीनं आयुष्य जगतोय. शारीरिक मर्यादा असूनही त्यानं शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण घेऊन तो थांबला नाही तर कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीची पात्रताही त्यानं पूर्ण केलीय.
अनुपनं स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय. सर्वच मतदारांनी त्याच्यापासून प्रेरणा घेत आपला हक्क बजावला पाहिजे. इच्छाशक्ती, जिद्द याचबरोबर नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव या सर्व गोष्टींचं उदाहरण अनुपनं घालून दिलंय.