जाहिरात
Story ProgressBack

पिवळी साडी अन् हातात हिरवा चुडा; लातूरच्या सुनेने पार पाडला मतदानाचा हक्क!

जेनेलिया देशमुख पिवळ्या रंगाची साडी आणि हातात  हिरवा चुडा घालून मतदान केंद्रावर दाखल झाली. 

Read Time: 1 min
पिवळी साडी अन् हातात हिरवा चुडा; लातूरच्या सुनेने पार पाडला मतदानाचा हक्क!
लातूर:

आज राज्यभरात 11 लोकसभा मतदारसंघात  मतदान पार पडत आहे. आज तिसऱ्या टप्प्यात लातूर मतदारसंघातही मतदान होत आहे. यावेळी रितेश देशमुख आपल्या कुटुंबासह लातूरला मतदान करण्यासाठी पोहोचला. रितेश देशमुख पत्नी जेनेलिया, आई आणि भाऊ धीरजसह मतदान केंद्रावर पोहोचला. यावेळी जेनिलिया देशमुख हिच्या लुकने लोकांचं लक्ष वेधलं. जेनेलिया देशमुख पिवळ्या रंगाची साडी आणि हातात  हिरवा चुडा घालून मतदान केंद्रावर दाखल झाली. 

बॉलिवूडमधील सुंदर दाम्पत्य म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईहून लातूरला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत रितेश देशमुखची आई आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली यांनीही मतदान केलं. 

मतदान केल्यानंतर रितेश देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलोय. सर्वांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. सर्वांनी मतदान करायला हवं.

लातूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, धीरज देशमुख, दीपिका देशमुख , वैशालीताई देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी बाभळगाव इथं येऊन मतदान केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं असं आव्हान सुद्धा अभिनेता रितेश देशमुख यांनी केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination