7 months ago
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झालं. महाराष्ट्रातील 11 तर संपूर्ण देशभरातील 93 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. राज्यातील  रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मंगळवारी (7 मे) रोजी मतदान झालं. निवडणूक आयोगानं संध्याकाळी 7 पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 53.95 टक्के मतदान झालं आहे.  

93 जागांवरील 1351 उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. यामध्ये 120 महिलांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), ज्योतिरादित्य सिंदिया (गुना), मनसुख मांडविया (पोरबंदर), पुरुषोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) या केंद्रीय मंत्र्यांचं भवितव्य बंद झालं आहे. 

May 07, 2024 19:42 (IST)

महाराष्ट्रात 54.9 टक्के मतदानाची नोंद

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात झालेलं मतदान

लातूर - 55.38 %

सांगली - 52.56 %

बारामती - 47.84 %

हातकणंगले - 62.18 %

कोल्हापूर - 63.71 %

माढा - 50 %

उस्मानाबाद (धाराशिव) - 55.98 %

रायगड - 50.31 %

रत्नागिरी -सिंधुदुर्ग - 53.75 %

सातारा - 54.11 %

सोलापूर - 49.17 %

May 07, 2024 17:37 (IST)

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदानाची नोंद

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदानाची नोंद  

संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

लातूर - 55.38 %

सांगली - 52.56 %

बारामती - 45.68 %

हातकणंगले - 62.18 %

कोल्हापूर - 63.71 %

माढा - 50 %

उस्मानाबाद (धाराशिव) - 52.78 %

रायगड - 50.31 %

रत्नागिरी -सिंधुदुर्ग - 53.75 %

सातारा - 54.11 %

सोलापूर - 49.17 %

May 07, 2024 15:34 (IST)

महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत सरासरी 42.63 टक्के मतदानाची नोंद

दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्या मतदार संघात किती मतदान? 

लातूर           44.48 % 

सांगली         41.30 % 

बारामती       34.96 % 

हातकणगले  49.94 % 

कोल्हापूर      51.51 % 

माढा            39.11  % 

धाराशिव      40.92 %  

रायगड        41.43 % 

रत्नागिरी       44.73 % 

सातारा        43.83 % 

सोलापूर      39.54   % 

May 07, 2024 15:10 (IST)

कोल्हापुरात मतदानाला निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापुरच्या उत्तरेश्वर पेटीतील रमाबाई आंबेडकर शाळेवर मतदानासाठी रांग लागली होती. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी महादेव सुतार हे निघाले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास मतदानासाठी येत असताना मतदान केंद्रासमोर त्यांना चक्कर आली. ते खाली पडले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते 69 वर्षांचे होते. 

Advertisement
May 07, 2024 15:04 (IST)

माढा लोकसभा मतदारसंघात दोन गटात तुंबळ हाणामारी

माढा लोकसभेतील सांगोला तालुक्यातील महुद येथे दोन गटात राडा झाला आहे. दोन गटात इथं तुंबळ हाणामारी झाली. यात शेकापचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. 

May 07, 2024 14:06 (IST)

प्रणव अदाणींनीही बजावला मतदानाचा अधिकार

प्रणव अदाणी यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी बोलताना भारतातील निवडणूक  जगातील सर्वात मोठी निवडणूक आहे. विविधता आणि एकतेचे उल्लेखनीय प्रदर्शन यातून होते.  जिथे प्रत्येक मत मोजले जाते. मी फक्त माझे संविधानिक कर्तव्य पार पाडत मतदान केले. आता तुमची पाळी! तुम्ही मतदान नक्की करा असे आवाहन प्रणव अदानी यांनी यावेळी केले आहे. 

Advertisement
May 07, 2024 13:51 (IST)

राम सातपुते यांची प्रणिती शिंदेंच्या समर्थकांसोबत बाचाबाची

सोलापुरातही काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याचे समोर आले आहे. भाजप उमेदवार राम सातपूते यांची प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यां सोबत बाचाबाची झाली. त्यावेळचा व्हिडीओही आता समोर आला आहे. 

May 07, 2024 13:37 (IST)

महाराष्ट्रात 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदानाची नोंद

दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या 11 मतदार संघातली टक्केवारी, कोल्हापूरात सर्वाधिक 

लातूर           32.71 % 

सांगली         29.65 % 

बारामती       27.55 % 

हातकणगले  36.17 % 

कोल्हापूर      38.42 % 

माढा            26.61  % 

धाराशिव      30.54 %  

रायगड        21.34 % 

रत्नागिरी       33.91 % 

सातारा        32.78 % 

सोलापूर      29.32   % 


Advertisement
May 07, 2024 13:28 (IST)

धाराशिवमध्ये शिंदे -ठाकरे गटात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, 4 जण जखमी

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी इथं  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे.  जवळपास 20 ते 22 जणांच्या जमावाने हा हल्ला केला आहे. यात समाधान नानासाहेब पाटील या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. पाटील हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. बुथवर मतदारांना आणताना हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळत आहे.  

May 07, 2024 13:09 (IST)

हातकणंगले मतदारसंघात राडा, आघाडी- युतीचे कार्यकर्ते भिडले

हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर राडा झाला आहे. महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्त्यांते एकमेकांना भिडले. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला.

 

May 07, 2024 12:57 (IST)

सुप्रिया सुळे यांनी घेतली आशा पवारांची भेट

सुप्रिया सुळे यांनी  मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बारामतीमधून थेट काठेवाडी गाठत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट दिलीय. या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलंय. मी आशा काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. मी फक्त काकींना भेटण्यासाठी आले होते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. इथं माझं नेहमीचं येणं जाणं असतं. त्याप्रमाणे मी आजही आले. घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी नेहमीच घेते. त्याप्रमाणे आजही आले. हे माझ्या काका काकींचं घर आहे. मी काका काकींच्या घरी आले आहे. असेही सुळे यांनी म्हटलं आहे.

May 07, 2024 12:36 (IST)

शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

शरद पवारंनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या बरोबर सुप्रिया सुळे मतदान केंद्रात उपस्थित होत्या. 

May 07, 2024 12:14 (IST)

जयंत पाटील यांनी मुलांसह केले मतदान

राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलगा प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील आणि सून  यांच्यासोबत मतदान केले.  वाळवा तालुक्यातील साखराळे येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

May 07, 2024 12:01 (IST)

मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या ठिकाणी घडलीय. तालुक्यातील किंजकोळी गावाजवळ असलेल्या दाभेकर कोंड मतदार केंद्राजवळ काही अंतरावरच ही घटना घडलीय. प्रकाश चिनकटे असे त्यांचे नाव आहे. 

May 07, 2024 11:56 (IST)

अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी बजावला मतदानाचा हक्का

अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी बोलताना त्यांनी हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे सांगितले. लोकशाहीत प्रत्येक मताला विशेष महत्व आहे. त्यामुळे सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. 

May 07, 2024 11:47 (IST)

सर्वात कमी मतदान बारामतीत

अकरा वाजेपर्यंत राज्यातल्या 11 मतदार संघातली मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान हे बारामती लोकसभा मतदार संघात झाले आहे. मतदानाची टक्केवारी 14.64 % नोंद झाली आहे. 

 

May 07, 2024 11:44 (IST)

महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत सरासरी 18.18 टक्के मतदानाची नोंद

11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरात 

लातूर           20.74 % 

सांगली         16.61 % 

बारामती       14.64 % 

हातकणगले  20.74 % 

कोल्हापूर      23.77 % 

माढा            15.11  % 

धाराशिव      17.06 %  

रायगड        17.18 % 

रत्नागिरी       21.19 % 

सातारा        18.94 % 

सोलापूर      15.69   % 

May 07, 2024 11:33 (IST)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले मतदान

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कराड इथं चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला.

May 07, 2024 11:22 (IST)

सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवारांची भेट

सुप्रिया सुळे यांनी मतदान केल्यानंतर त्या थेट काठेवाडीतल्या अजित पवार यांच्या घरी गेल्या. या भेटीची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे. सुप्रिया सुळे नक्की कशासाठी अजित पवारांच्या घरी गेल्या यामागचे कारण समजू शकले नाही. 

May 07, 2024 11:14 (IST)

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल

सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. मतदानाला सुरूवात झाल्यापासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल येत आहे. कार्यकर्त्यांचा किरण सामंत यांना  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. 

May 07, 2024 11:11 (IST)

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीनी मतदान केले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. 

May 07, 2024 10:34 (IST)

साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनीही बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. सातारा लोकसभा मतदार संघात उदयन राजे भोसले आणि शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. 

May 07, 2024 10:31 (IST)

मिरजेत मतदान केंद्रावर वाद

मिरजेत मतदान केंद्रावर वोटिंग मशीन, क्रमाने लावले नसल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील समर्थकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.  हे षडयंत्र असल्याचा आरोप अय्याज नायकवडी यांनी केला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षण मंदिर या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर थोडा वाद निर्माण झाल्या होता.   

May 07, 2024 10:27 (IST)

उदयन राजे भोसले यांनी मतदानाचा बक्क बजावला

सातार लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार उदयन राजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. साताऱ्यात राजेंनी आपलं मतदान केलं. 

May 07, 2024 10:20 (IST)

आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलने केले मतदान

दिवंगत नेते माजी उपुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन ताई पाटील, रोहित पाटील यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील गावी जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. 

May 07, 2024 10:13 (IST)

कोल्हापूर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथे केले मतदान

सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापुरातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असे ते यावेळी म्हणाले. कोल्हापुरात काहीतरी मिरॅकल घडेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेचा इंडिया आघाडीलाच कौल आहे. त्यामुळेच मोदींच्या सभांना गर्दी नाही. शाहू महाराजांचा आवाज दिल्लीत जाणार आहे, त्याचा आनंद कोल्हापूरकर साजरा करत आहेत असेही ते म्हणाले. 

May 07, 2024 10:08 (IST)

शरद पवारांनी रांगेत उभे राहुन केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत मतदान केले. यावेळी त्यांच्या बरोबर सुप्रिय सुळे उपस्थित होत्या. शरद पवारांनी रांगेत उभे राहून मतदान केले. 

May 07, 2024 10:06 (IST)

माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले मतदान

कडेगाव तालुक्यातील सोनसळ या मूळ गावी विश्वजीत कदम यांनी आपला बजावला मतदानाचा हक्क बजावला. विश्वजित कदम यांची आई विजयमाला कदम आणि पत्नी स्वप्नाली कदम यांनीही यावेळी मतदान केले. 

May 07, 2024 10:04 (IST)

सोलापूर करमाळा तालुक्यातील पाथर्डी येथे ईव्हीएम मशीन पडले बंद

पाथर्डी इथे ईव्हीएम मशीनचे कनेक्शन लूज झाले होत. त्यामुळे मतदान यंत्र बंद पडले होते. त्यामुळे काही वेळ मतदानही बंद होते. मात्र ते तात्काळ सुरू करण्यात आले. मतदार आता इथे मतदान करत आहेत. 

May 07, 2024 10:01 (IST)

देशात सर्वात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात

देशात सर्वात कमी मतदानाची नोंद सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्रात झाली आहे. पहिल्या दोन तासात महाराष्ट्रात 6.64 मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये 14.60 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या दोन तासातली ही मतदानाची नोंद आहे.   

May 07, 2024 09:57 (IST)

माढ्यात संथगतीने मतदान, सर्वात कमी मतदानाची नोंद

माढा लोकसभा मतदार संघात पहिल्या दोन तासात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत या मतदार संघात केवळ 4.99 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

May 07, 2024 09:55 (IST)

सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान सिंधुदुर्गात

सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यातल्या 11 लोकसभा मतदार संघा पैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या मतदार संघात पहिल्या दोन तासात 8.17 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

May 07, 2024 09:53 (IST)

महाराष्ट्रात सरासरी 6.64 टक्के मतदानाची नोंद

महाराष्ट्रात सरासरी 6.64 टक्के मतदानाची नोंद 

लोकसभा मतदार संघात 9 वाजेपर्यंत झालेले मतदान

लातूर  7.91 % 

सांगली         5.81 % 

बारामती       5.77 % 

हातकणगले  7.55 % 

कोल्हापूर      8.04 % 

माढा            4.99  % 

धाराशिव      5.79 %  

रायगड        6.84 % 

रत्नागिरी       8.17 % 

सातारा        7.00 % 

सोलापूर      5.92   % 

May 07, 2024 09:42 (IST)

वैभव नाईक यांनी कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुटूंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला. कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील जि.प. शाळा नंबर ५ येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी आ.वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक, सुशांत नाईक ,संकेत नाईक,सेजल नाईक, मयुरी नाईक यांनी मतदान केले.

May 07, 2024 09:40 (IST)

नारायण राणेंनी पत्नी आणि सुनेसह केले मतदान

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी पत्नी आणि सुनेसह केले मतदार. कणकवलीमध्ये राणेंनी बजावला मतदानाचा हक्क.

 

May 07, 2024 09:35 (IST)

सुप्रिया सुळेंनी आपल्या कुुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

सुप्रिया सुळे यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांच्या बरोबर आई प्रतिभा पवार, पती सदानंद भालचंद्र सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे त्यांच्या सोबत होते. बारामती शहरातील रिमांड होम मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. 

May 07, 2024 09:31 (IST)

प्रणिती शिंदेनी बजावला मतदानाचा अधिकार

सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क. सर्वांना मतदार करण्याचे केले आवाहन. सोलापूरात मतदारांमध्ये जोरदार उत्साह.

May 07, 2024 09:20 (IST)

रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. 

May 07, 2024 09:07 (IST)

राम सातपुतेंचे माळशिरसमध्ये मतदान

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते व त्यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील बांबुर्डे येथे मतदानाचा हक्क बजावला. 

May 07, 2024 09:04 (IST)

सोलापूरात मतदानासाठी मतदारांचा उत्साह

सोलापूरमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रा बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी. मुस्लिम बहूल भागातही मतदानासाठी मोठमोठ्या रांगा. 

May 07, 2024 09:02 (IST)

सोलापूरात माजी आमदार आडम मास्तरांनी केलं मतदान

माजी आमदार आडम मास्तर यांनी आपल्या परिवारासह मतदान केले. सोलापूरच्या बापूजीनगर ज्ञान सागर शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

May 07, 2024 08:54 (IST)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी आपली आई आपल्या बरोबर आहे. विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

May 07, 2024 08:50 (IST)

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदानाचा अधिकार बजावला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून वगळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

May 07, 2024 08:46 (IST)

नारायण राणे मतदानासाठी रवाना

मतदानाला जाण्या पूर्वी नारायण राणे यांचे त्यांच्या पत्नी निलम राणे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर नारायण राणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रवाना झाले.  

May 07, 2024 08:39 (IST)

रत्नागिरीत मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

रत्नागिरीत मतदान केंद्रा बाहेर मतदानासाठी मोठ्या रांगा. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह. तरूणांसह वृद्धही मतदानासाठी रस्त्यावर उतरले. 

May 07, 2024 08:31 (IST)

हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे आणि चिरंजीव निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

May 07, 2024 08:23 (IST)

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी केले मतदान

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. लातूरमध्ये या दोघांनीही मतदान केले. यावेळी आमदार धिरज देशमुख, आई वैशाली देशमुख यावेळी उपस्थित होत्या. 

 

May 07, 2024 08:20 (IST)

शाहू महाराजांची नात यशस्विनी राजे यांनी केले मतदान

कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर शाहू महाराज यांची नात यशस्विनी राजे यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. 

May 07, 2024 08:17 (IST)

संभाजी राजेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

संभाजी राजे छत्रपती आणि मधुरिमा राजे यांनी मतदान केले. कोल्हापूरात या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला. शाहू छत्रपती महाराज यांच्या घरातील प्रत्येक सदस्यांनी मतदान केलं.

May 07, 2024 08:14 (IST)

शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराजांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापुरातील महानगरपालिका शाळा येथे त्यांनी मतदान केलं.

May 07, 2024 08:07 (IST)

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केले मतदान

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. धाराशिव तालुक्यातील सारोळा या गावात कैलास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.  मतदान करण्यापूर्वी कैलास पाटील याना ओवाळण्यात आले.

May 07, 2024 08:05 (IST)

'मी मतदान केलंय तुम्हीही मतदान करा'

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क. 'मी मतदान केलंय तुम्हीही मतदान करा' असा संदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी दिला आहे.

May 07, 2024 08:02 (IST)

धाराशिवमध्ये मतदान यंत्राची पुजा करून मतदानाला सुरूवात

महविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या गावात EVM ची पूजा करून मतदानाला केली सुरुवात.

May 07, 2024 08:01 (IST)

रोहीत पवारांनी बारामतीत केले मतदान

आमदार रोहीत पवार, वडील राजेंद्र पवार यांनी बारामती मधील पिंपळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व कुटुंब होतं. 

May 07, 2024 07:58 (IST)

मतदान करण्याचे मोदींचे देशवासीयांना आवाहन

नागरिकांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे. काल रात्रीच अहमदाबादला मतदानासाठी आलोय. आता महाराष्ट्रात आणि तेलंगाणात प्रचारासाठी जायचं आहे, असं मतदाना नंतर पंतप्रधान मोदी बोलले. 

May 07, 2024 07:54 (IST)

May 07, 2024 07:53 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या निशान उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्या बरोबर गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. 

May 07, 2024 07:39 (IST)

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव तालुक्यातील सारोळा गावात कैलास पाटील यांनी मतदान केलं.  

May 07, 2024 07:38 (IST)

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 918 मतदान केंद्रांवर 6 लाख 64 हजार 566 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. महायुतीचे नारायण राणे आणि इंडिया आघाडीचे विनायक राऊत यांच्यात प्रमुख लढत होईल.