पालघरमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, मतदानापासून वंचित राहिल्याने मतदारांचा संताप

पालघरमध्ये अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे पाहायला मिळाले. याद्यांमध्ये नाव नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

पालघरमधील वाडा शहरामध्ये अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मतदार यादीतून कित्येक मतदारांचे नाव गायब झाले आहे. त्यामुळे अनेक मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले आहेत. याबाबत मतदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कपिल प्रभाकर चुंबळे यांना देखील मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले आहे. झालेल्या गोंधळाबाबत त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, "वाडामधील शिवाजी नगर येथील मी रहिवासी आहे. माझा विभाग क्रमांक 18 होता, पण यावेळेस मी मतदानासाठी आलो तर यादीमध्ये माझे नावच नसल्याचे आढळले. सर्व याद्या तपासल्या पण माझे नाव कुठेच नव्हते. माझ्याकडे मतदार कार्ड आहे पण यादीमध्ये नाव नसल्याने मतदान करता आले नाही". 

(नक्की वाचा: Exclusive: देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे)

निवडणूक अधिकारी काय म्हणाले?

"मतदार यादीमध्ये नाव नाही तर तुम्ही मतदान करू शकत नाही, असे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे कपिल म्हणाले. 

(नक्की वाचा: धुळ्यात मतदानाचा उत्साह; 92 वर्षाच्या आजीबाई वनिता पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क)

मतदाराने व्यक्त केला संताप 

"यादीतून नाव गायब होणे योग्य नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार हिरावला जात आहे. यादीतून कोणाचेही नाव वगळले जाणार नाही, यासाठी यापुढे प्रशासनाने याची काळजी घ्यावी", असे म्हणत कपिल प्रभाकर चुंबळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

(नक्की वाचा: Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान)

दुबईहून मुंबईत मतदानासाठी आले, पण... 

निशित पारेख हे देखील दुबईहून देशामध्ये मतदान करण्यासाठी आले होते. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निशित न चुकता भारतामध्ये येतात. निशित यांचे घाटकोपर येथे निवासस्थान आहे. पण यंदा यादीमध्ये नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले आहे. 

VIDEO: पालघरमध्ये मतदार याद्यांचे घोळ कायम, अनेक नागरिकांचं मतदान हुकलं

Topics mentioned in this article