भावना गवळींचा निर्णय झाला, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत केली घोषणा

Bhavana Gawali : यवतमाळ-वाशिमच्या मतदारसंघातील शिवसेना खासदार भावना गवळी यांचं तिकीट यंदा कापण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bhavana Gawali : भावना गवळी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली नाही.
वाशिम:

Bhavana Gawali : लोकसभा निवडणुका जाहीर होताच पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान सर्व राजकीय पक्षांसमोर असतं. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होत आहे. दोन्ही आघाडींना जागावाटप करताना पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याची कसरत करावी लागत आहे. यवतमाळ-वाशिमच्या मतदारसंघातील शिवसेना खासदार भावना गवळी यांचं तिकीट यंदा कापण्यात आलं आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. गवळी यांनी अखेर पत्रकार परिषद घेत त्यांचा निर्णय जाहीर केला.

काय घेतला निर्णय?

भावना गवळी यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका जाहीर केली. 'माझी नाराजी कालही नव्हती, आजही नाही. मी इतकी वर्ष काम केलं आणि त्यानंतर एकदमच कसं काय होऊ शकतं हा प्रश्न पडला होता. मला उमेदवारी न मिळाल्यानं खंत वाटली. त्यामुळे मी बाहेर पडले नाही. 

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अवस्थेला नाना पटोले जबाबदार? कार्यकर्त्यांनी मनातलं सांगून टाकलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर शिवसेना उमेदवार जयश्री पाटील यांचा प्रचार करणार आहे, असं भावना गवळी यांनी जाहीर केलं.' गवळी यांनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला अबकी बार 400 पार हा नारा यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी गेली 25 वर्ष हा किल्ला लढवला आहे. मी यापूर्वीही पक्षाचं काम करत होते, यापुढेही करेल. मला काय मिळतंय यासाठी मी काम करत नाही. माझे लक्ष पदावर नव्हते. जे झालं ते भूतकाळ आहे. माझ्यासाठी शिवसेना हा पक्ष महत्त्वाचा आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही कामाला लागलोय, असं गवळी यांनी जाहीर केलं.  
 

Advertisement