लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात तब्बल 62 % मतदान, 'या' राज्याचा आकडा 80 टक्क्यांवर

देशभरात लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा शनिवारी,  25 मे रोजी पार पडला.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

देशभरात लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा शनिवारी,  25 मे रोजी पार पडला. सहाव्या टप्प्यात 58 मतदारसंघात मतदान पार पडलं. सहाव्या टप्प्यात एकूण 61.75 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या 58 जागांवर झालेल्या मतदानाच्या तुलनेत कमी आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान झालं आहे. यानंतर झारखंडमध्ये 63.76 टक्के आणि ओडिशात 71 टक्के मतदान झालं. हरियाणात 62 टक्के, दिल्लीत 58.3 टक्के, बिहारमध्ये 55.24 टक्के, उत्तर प्रदेशात 54.03 टक्के,  जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग राजौरी जागेवर 54.46 टक्के मतदान झालं. यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जारी करण्यात येईल. 

शनिवारी सहाव्या लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यापर्यंत 543 पैकी 486 जागांवर मतदान झालं आहे. अद्याप 57 मतदारसंघात शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडेल. यानंतर  4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. 

सातव्या टप्प्यात कोण कोण मैदानात?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बिहार, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडतील. आठ राज्यांमधील 57 जागांवर शेवटच्या टप्प्यात निवडणूक होतील. 

Advertisement

नक्की वाचा - अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय

सातव्या टप्प्यात कुठे होणार मतदान?
उत्तर प्रदेश - 13 
बिहार - 8
पंजाब - 13
ओडिशा - 6
हिमाचल प्रदेश - 4
झारखंड - 3
चंदीगड - 1
पश्चिम बंगाल - 9