महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे?

सुरूवातीचे कल पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्क दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या तासाभरातले कल हाती आले आहेत. सुरूवातीचे कल पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्क दिसून येत आहे. 48 जागां पैकी महायुतीने 27 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने 19 जांगावर मुसंडी मारली आहे. सांगलीत विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. तर पालघरमध्ये हितेंद्र ठाकूरांच्या बविआने आघाडी घेतली आहे. सर्वच जागांवर चुरशीची लढत सुरू आहे. 

LIVE Election Results 2024: नरेंद्र मोदी 13 हजार मतांनी, तर राहुल गांधी 80 हजार मतांनी आघाडीवर

दिग्गज नेते पिछाडीवर

सुरूवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. त्यात बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधिर मुनगंटीवार, वर्षा गायकवाड, राहुल शेवाळे, हिना गावित, सुभाष भांबरे, चंद्रकांत खैरे, सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे हे नेते पिछाडीवर आहे. या सर्व नेत्यांच्या मतामधील अंतर हे कमी जास्त होत आहे. प्रत्येक फेरीनंतर इथे फरक पडताना दिसत आहे. जो पर्यंत शेवटची फेरी होत नाही तो पर्यंत निकाल काय लागेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. देशातही इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये चुरशीची लढत होत आहे. तसाच प्रत्येय महाराष्ट्रातही येताना दिसत आहे. 

हेही वाचा - Maharashtra Election Results 2024 Live : पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे, उदयनराजे भोसले पिछाडीवर

कोणत्या मतदार संघात चुरस 

बारामती, रायगड, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातही कट टू कट फाईट पाहायला मिळत आहे. अहमदनगर आणि माढा मतदार संघातही मतांचे अंतर कमी जास्त होताना दिसत आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या अहमदनगर मतदार संघात निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात चुरस दिसत आहे. सध्याच्या स्थितीत लंके हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सुरूवातीच्या कलात जवळपास सर्वच मतदार संघात चुरस दिसून येत आहे.  

कोण उमेदवार आघाडीवर ? 

चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, सांगलीतून विशाल पाटील हे आघाडीवर आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज, साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्के हे आघाडीवर आहे. तर नवनीत राणा यांनीही आघाडी घेतली आहे. मुंबईत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अमोल किर्तीकर, छत्रपती संभाजीनगर मधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. तर माढ्यातून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर आहेत.   

Advertisement