जाहिरात
6 months ago
नवी दिल्ली:

Lok Sabha Elections 2024 Results LIVE:

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय - PM मोदी  

 भाजपने जितक्या जागा जिंकल्या, तितक्या जागा सर्व विरोधक मिळूनही जिंकू शकले नाहीत - PM मोदी

140 कोटी भारतीयांचा हा विजय आहे- PM मोदी

माझ्या आईच्या निधनानंतर ही माझी पहिलीच निवडणूक आहे - PM मोदी

देशातील माता-बहिणींनी मला माझ्या आईची उणीव भासू दिली नाही - PM मोदी

आज माझ्यासाठी अतिशय भावुक दिवस आहे - पंतप्रधान मोदी

आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे काम केले - पंतप्रधान मोदी

ओडिशामध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

काश्मिरच्या लोकांनी रेकॉर्डब्रेक मतदान केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

NDAला भव्य विजय मिळाला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप ओडिशामध्ये सरकार स्थापन करणार - PM मोदी

आजचा निकाल हा लोकशाहीचा विजय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

निवडणूक आयोगाच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक भारतीयाला अभिमान - PM मोदी

हा विजय सबका साथ सबका विकासाचा आहे - PM मोदी

विकसित भारताच्या प्रतिज्ञेचा हा विजय आहे - PM मोदी 

आम्ही सर्व जनतेचे खूप आभारी आहोत - PM मोदी 

विजयवाडा, आंध्र प्रदेश: भाजपचे राज्य प्रभारी सिद्धार्थनाथ सिंह यांनी पक्षातील अन्य नेत्यांसोबत जल्लोष केला साजरा 

Election Results: TDP अध्यक्ष चंद्राबाबू नायडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात : सूत्र

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह विजयी 

UP Results: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी, 1 लाख 52 हजार 513 मतांनी PM मोदी जिंकले

पंजाब: शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्या आणि भटिंडातील उमेदवार हरसिमरत कौर बादल म्हणाल्या की, "... या विजयाचे श्रेय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते... हा भटिंडाच्या मतदारांचा विजय आहे..."

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी 

लोकसभा निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- राहुल गांधींचा परफॉर्मन्स मोदींपेक्षा बेस्ट 

- राहुल गांधींनी शून्यातून काँग्रेसला वर आणले

- चिन्हामुळे काही ठिकाणी फटका बसला 

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आणि केंद्रीय अनुराग ठाकूर विजयी. सलग पाचव्यांदा विजय.

मी चंद्राबाबू नायडू यांना फोन केला, यामध्ये काहीही तथ्य नाही - शरद पवार 

मी कोणालाही फोन केला नाही - शरद पवार

Lok Sabha Election Result 2024 | राहुल गांधींना 'भारत जोडो'चा फायदा झाला?, उदय निरगुडकरांचं विश्लेषण

राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की" नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, पण देशातील जनतेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार हवे आहे हे स्पष्टपणे दिसून येते. विरोधकांनी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला पण देशातील जनतेने भाजपला जनादेश दिला".

राजस्थानमधील 25 लोकसभा मतदारसंघांपैकी 14 जागांवर भाजप आघाडीवर आहे

हसन लोकसभा मतदारसंघ वगळता आम्हाला अपेक्षित निकाल मिळाले आहेत: एचडी कुमारस्वामी, जेडी(एस) नेते 

MP election Results:मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा स्थापन करेल, याचे मला समाधान आहे. मध्य प्रदेशात भाजप 29 पैकी 29 जागांवर आघाडीवर आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो."

दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचा जप केला. ECIच्या माहितीनुसार,  भाजपने आतापर्यंत 2 जागा जिंकल्या आहेत.

EC Results 2024: राजस्थान: जयपूरमधून भाजपच्या मंजू शर्मा विजयी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले: टीडीपी सूत्र

ECIच्या माहितीनुसार - TDP 16 जागांवर आघाडीवर आहे. 

2 निवडणुकांनंतर काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, कोणत्या राज्यांनी दिला राहुल गांधींना 'हात'?

Lok Sabha Elections 2024 Result : 2014 आणि 2019 मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस 100 जागांच्या जवळ पोहोचलीय.

 गुना मतदारसंघातून भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया विजयी

Delhi Election Results: दिल्लीतील सातच्या सात जागांवर भाजप आघाडीवर, दिल्ली भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

मेरठ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अरुण गोविल पिछाडीवर 

मध्य प्रदेश: इंदुर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर लालवानी 7,89,625 मतांनी आघाडीवर आहेत.

आताच्या आकडीवारीनुसार 1,69,228  लाख मतदारांनी स्वीकारला नोटाचा पर्याय 

Lok Sabha Election Result 2024 LIVE Updates | पंतप्रधान मोदींची सेना म्हणून काम करेन- कंगणा राणौत 

अमित शाह 4 लाख 45 हजार मतांनी आघाडीवर 

राहुल गांधी वायनाडमधून 2 लाख 38 हजार मतांनी आघाडीवर

India Election Results:  "ही माझी जन्मभूमी आहे. मी इथल्या जनतेची सेवा करेन. मोदीजींच्या सबका साथ, सबका विकास या स्वप्नात मी योगदान देईन"- कंगणा राणौत

Rajasthan election Results: राजस्थानातील भाजपचे उमेदवार दामोदर अग्रवाल 1,81,586 मतांनी आघाडीवर, दामोदर यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष  

Election Results 2024 LIVE: महाराष्ट्रात मविआ 30 जागांवर आघाडीवर 

 शिवसेना UBT-11, काँग्रेस 11, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) -8 , भाजप 11, शिवसेना (शिंदे गट )-5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एपी)-1 जागेवर आघाडीवर

अमेठीतून स्मृती इराणी 45905 मतांनी पिछाडीवर, राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतूनही आघाडीवर 

UP election Results: भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी राधा रमण मंदिरात केली पूजा 

Haryana Results: हरियाणामध्ये काँग्रेस 6 तर भाजप 4 जागांवर आघाडीवर

अंबाला - वरुण चौधरी 27362 मतांनी आघाडीवर 

भिवानी  - धर्मवीर 5167 मतांनी आघाडीवर  

फरीदाबाद - भाजपचे कृष्णपाल गुर्जर 15276 मतांनी आघाडीवर  

गुरुग्राम - राज बब्बर 38095 मतांनी आघाडीवर 

हिसार - काँग्रेसचे जय प्रकाश 7722 मतांनी आघाडीवर

करनाल - मनोहर लाल खट्टर 43171 मतांनी आघाडीवर  

कुरुक्षेत्र - भाजपचे नवीन जिंदल 565 मतांनी आघाडीवर  

रोहतक - दीपेंद्र हुड्डा 81330 मतांनी आघाडीवर  

सिरसा   - कुमारी सैलजा 76484 मतांनी आघाडीवर  

सोनीपत - सतपाल ब्रह्मचारी 4549 मतांनी आघाडीवर  

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का

सपा - 34

भाजप - 34

काँग्रेस - 9

आरएलडी - 2

आझाद समाज पार्टी (Kanshi Ram) - 1

ECI Results LIVE : भाजप 237 जागा, काँग्रेस 97 जागा, सपा 33, तृणमूल काँग्रेस 29, डीएमके 21 जागांवर आघाडीवर

 

Chunav Results LIVE: ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट; भाजप 71 जागा,  BJD 47 जागा आणि काँग्रेस  13  जागांवर आघाडीवर

Odisha Assembly election Results: नवीन पटनायक 521 मतांनी पिछाडीवर  

Lok Sabha Election 2024 Result : PM नरेंद्र मोदी 64 हजार, तर रायबरेलीतून राहुल गांधी 110922 मतांनी आघाडीवर

काँग्रेस 150हून अधिक जागांवर विजय मिळवेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील. देशामध्ये इंडिया आघाडी पुढे राहील - संजय राऊतांचा दावा

मुंबईतील सहा लोकसभा जागांवरील परिस्थिती

 

NDA - 3 , मविआ - 3 

मुंबई उत्तर-  भाजपचे पीयूष गोयल 41,268 मतांनी आघाडीवर  

मुंबई उत्तर मध्य- भाजपचे उज्वल निकम 19,859 मतांनी आघाडीवर

मुंबई  उत्तर पश्चिम –शिंदे गटाचे रवींद्र वायकर 6,822 मतांनी आघाडीवर

मुंबई ईशान्य – उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील 15,348 मतांनी आघाडीवर

मुंबई दक्षिण - उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत 9,185 मतांनी आघाडीवर

मुंबई दक्षिण मध्य - उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई 8,437 मतांनी पुढे आघाडीवर

दिल्ली: प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या खान मार्केटमधील निवासस्थानी राहुल गांधी दाखल 

ECI - भाजप 237, काँग्रेस 97, सपा - 34 जागांवर आघाडीवर 

ECIच्या माहितीनुसार, भाजप 231, काँग्रेस 100, सपा - 33, तृणमूल काँग्रेस - 22, डीएमके 17 जागांवर आघाडीवर

चंदीगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मनीष तिवारी आघाडीवर 

हिमाचल प्रदेश : मंडीतील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौतने निवासस्थानी केली प्रार्थना. ECI ट्रेंडनुसार, कंगणा 30,254 मतांनी आघाडीवर आहे.

अमित शाह 1 लाख 99 हजार 732 हजार मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election Result 2024 LIVE | यूपीमध्ये समाजवादी पक्ष आघाडीवर, उदय निरगुडकरांचं विश्लेषण

Election Results: उत्तर प्रदेशात सपा 33, भाजप 28, काँग्रेस 6 आणि आरएलडी एका जागेवर आघाडीवर ; अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर  

कर्नाटकातील जेडी(एस)चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना 1 हजार 446 मतांनी आघाडीवर 

Share Market Update : निवडणूक कलांचे शेअर मार्केटमध्ये पडसाद, सेंसेक्स कोसळला

Stock Market Live News Update:  लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांचे शेअर मार्केटमध्ये पडसाद उमटले आहेत.

नरेंद्र मोदी 13 हजार मतांनी, तर राहुल गांधी 65 हजार मतांनी आघाडीवर

नरेंद्र मोदी वाराणसीतून 13 हजार मतांनी आघाडीवर, राहुल गांधी वायनाडमधून 80 हजार मतांनी आघाडीवर

Elections Results 2024: NDAने पार केला 300चा आकडा, इंडिया आघाडी 207 जागांवर आघाडीवर 

 

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र पुन्हा आघाडीवर 

ECIने दिलेल्या माहितीनुसार, 429 जागांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजप 200 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर, समाजवादी पार्टी 29 जागांवर आघाडीवर आहे.

UP Results: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, लखनौमधून राजनाथ सिंह  पिछाडीवर 

 

मैनपुरीतून डिंपल यादव आणि अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर. 

मेरठमधून भाजपचे उमेदवार अरुण गोविल पिछाडीवर.

कैसरगंजमधून भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण आघाडीवर.

Lok Sabha elections 2024 : मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी आमची टीम कंट्रोल रुममध्ये उपस्थित. मतमोजणी पारदर्शकतेने पार पडावी, याकरिता पोलिंग एजंट आणि उमेदवारांना उपस्थित राहण्याची परवानगी - सीईसी राजीव कुमार 

राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड मतदारसंघातून आघाडीवर 

भारतातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने दिलेला हा एक ऐतिहासिक जनादेश असल्याचे दिसते - तेजस्वी सूर्या, बंगळुरू दक्षिणमधील भाजप उमेदवार

Stock Market Update: शेअर बाजाराचा मूड बदलला,  सेंसेक्स 1800 अंकांनी आणि निफ्टी 550 अंकानी घसरला.  

 जम्मू-काश्मीर- माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आघाडीवर तर मेहबूबा मुफ्ती पिछाडीवर

पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौ लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. 

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार बन्सुरी स्वराज यांनी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आणि देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

छत्तीसगड: दुर्ग मतदारसंघातील भाजप उमेदवाराने सेक्टर 9 भिलाईमधील हनुमान मंदिराचे दर्शन घेतले.  

 4 जून 2024 हा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील - अर्जुन राम मेघवाल ( केंद्रीय मंत्री आणि बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार)  

Bihar election Results: बिहारमध्ये पप्पू यादव, तारिक अनवर, ललन सिंह आघाडीवर 

राहुल गांधी, हेमा मालिनी, डिंपल यादव, राजनाथ सिंह, धर्मेंद्र यादव यासारखी मोठी नावे उत्तर प्रदेशातील जागांवर आघाडीवर  

मंडी लोकसभा मतदारसंघातून पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत भाजप उमेदवार कंगना राणौत पिछाडीवर. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह आघाडीवर आहेत.

"अमित शाह मोठ्या मताधिक्याने विजयी होतील"- आमदार कनू पटेल 

रामराज्य कायम राहणार आहे, जगातील सर्वात मोठा नेता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला - रवी किशन, भाजप खासदार आणि गोरखपूरचे उमेदवार   

तामिळनाडू: शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कार्ती चिदंबरम यांनी शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथील मंदिरात प्रार्थना केली.

मध्य प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष व खजुराहो मतदारसंघातील उमेदवार व्हीडी शर्मा यांनी मतमोजणीपूर्वी पन्ना येथील जुगल किशोर मंदिराचे दर्शन घेतले.  

एक्झिट पोल सर्व खोटे आहेत आणि संध्याकाळपर्यंत हे सिद्ध होईल. इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल - लखनौमधील इंडिया आघाडीचे उमेदवार रविदास मेहरोत्रा 

ECIने ईव्हीएम हॅक करण्यासाठी बक्षीस जाहीर करावे - काँग्रेस नेते प्रताप सिंह खाचरियावास

उत्तर प्रदेश: रायबरेली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू  

Rajasthan Election Results: जोधपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर देशाचे लक्ष. गजेंद्र सिंह शेखावत यांनी विजयाच्या हॅटट्रिकचा दावा केला. गजेंद्र सिंह शेखावत निवडणूक कार्यालयात उपस्थित.   

201 किलोचे लाडू... 11 वेगवेगळे प्रकार... विजया आधीच जल्लोषाची तयारी

छत्तीसगड भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त करत तब्बल 201 किलो लाडू तयार ठेवले आहे. शिवाय त्यात 11 वेगवेगळ्या प्रकराचे हे लाडू आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 निकाल : मतमोजणीला सुरुवात

Chandigarh Election Results:चंदीगड लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसने बंडखोर नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षातील पाच वरिष्ठ सदस्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तर पाच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून मुक्त केले आहे. तिकीट न मिळाल्यानं सर्वजण नाराज होते.

मंगळवार हा हनुमानाचा दिवस आहे. लोकांनी आपापली मते मांडली आहेत, ईव्हीएममध्ये मतं बंद आहेत. जनतेचा कौल काहीही असो, सर्वांनी तो आदराने स्वीकारला पाहिजे. - मनीष तिवारी,  काँग्रेसचे खासदार आणि चंदीगडमधील उमेदवार 

 भाजपने उघडलं खातं, सुरतमधील जागा जिंकली 

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये पुरी आणि मिठाई तयार केली जात आहे. 

"चांदणी चौकची जागा आम्ही विक्रमी मतांनी जिंकू. दिल्लीतील सातही जागा भाजप बहुमताने जिंकेल" - प्रवीण खंडेलवाल, भाजप उमेदवार

झज्जर, हरियाणा: डीएसपी शमशेर सिंह म्हणाले, "...पोलीस सुरक्षा व्यवस्था तीन स्तरांमध्ये करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात जाणारे लोक ECI मार्गदर्शक तत्त्वांनुसार जात आहेत. फोन, मोबाइल, घड्याळ, सिगारेट, माचिस या गोष्टींना परवानगी नाही. ..”

रांची: उपायुक्त राहुल कुमार सिन्हा म्हणाले, "सर्व तयारी सुरू आहे. सर्व अधिकारी आपापल्या ड्युटीवर हजर आहेत. नियोजित वेळेनुसार मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल."

चांदणी चौकातील भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीतील गौरी शंकर मंदिरात प्रार्थना केली.

मी फार उत्साहित आहे आणि ज्यांनी संपूर्ण देशात भाजपला मतदान केले आणि विशेषतः ही विशिष्ट जागा आम्ही जिंकून हैदराबादला न्याय मिळवून देऊ. आपणा सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी देशासाठी खूप काम केले आहे. मला खात्री आहे की आज संपूर्ण देश '400 पार' साठी शुभेच्छा देत असेल - माधवी लता, भाजप उमेदवार 

रांची : "आम्ही 400चा आकडा पार करू, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशावर प्रेम आहे आणि देशालाही ते आवडतात... ते नक्कीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील" - प्रतुल शाह देव, प्रवक्ते, भाजप ( झारखंड )  

महाराष्ट्र : नागपुरातील मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात 

ओडिशा :  भुवनेश्वरमधील मतमोजणी केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली 

राजस्थान: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जयपूरमधील भाजप पक्षाचे कार्यालय सजवण्यात आले आहे.  

झारखंड : रांची येथील मतमोजणी केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली. सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com