भाजप आपले नेते राष्ट्रवादीत का पाठवतेय? अजित पवारांवर भाजप नेत्यांना उमेदवारी देण्याची वेळ का?

अजित पवार गटालाही दोन पावलं मागे घेत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा ही केली. मात्र त्यात एक बाब प्रखर्षाने जाणवली. ती म्हणजे महायुतीत भाजपने आपले नेते मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत नाही तर शिवसेने शिंदे गटात पाठवले आहे. ऐवढेच नाही तर त्यांना त्या पक्षाने उमेदवारीही दिली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भाजपनेच आपले हे नेते राष्ट्रवादीत पाठवले आहेत. या मागे भाजपची काही गणिते आहेत. विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळेच भाजपने ही विशेष रणनिती आखली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर दुसरी यादीही जाहीर केली आहे. अजित पवारांच्या यादीवर लक्ष टाकले असता अनेक जागांवर अजित पवारांना भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. विशेष म्हणजे भाजपनेच आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये पाठवले आहे. त्यात संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राजकुमार बडोले,निशिकांत पाटील या भाजप नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने केवळ भाजपमधून आलेल्या नेत्यांनाच उमेदवारी दिली नाही तर काँग्रेसमधून आलेल्या सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी,भरत गावित, हिरामण खोसकर यांनाही उमेदवारी दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार! किती आणि कोणत्या मतदार संघात भिडणार?

या मागे काही गणितं भाजप नेत्यांनी आखली आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यांना केवळ एकच खासदार निवडून आला होता. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी भाजपने घेतली आहे. जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला फटका बसला तर महायुतीला ही फटका बसू शकतो याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच भाजपने आपल्याकडील तगडे उमेदवार राष्ट्रवादीमध्ये पाठवले आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजयकाका पाटील तासगाव, प्रताप पाटील चिखलीकर लोहा, निशिकांत पाटील इस्लामपूर, अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीकडून महाविकास आघाडीची हवाई कोंडी! सर्व हेलिकॉप्टर बुक, तासाचं भाडं किती?

भाजपने या शिवाय शिवसेना शिंदे गटातही आपले नेते पाठवले आहेत. त्यात प्रदेश सचिव असलेले माजी खासदार निलेश राणे यांचा समावेश आहे. निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना भाजपमधून उमेदवारी शक्य नव्हती. अशा वेळी भाजप श्रेष्ठींनी त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रमाणे शिवसेनेतेही भाजपने आपले नेते पाठवले आहेत. या शिवाय काही मतदार संघात भाजप मनसेलाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यात  कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील, माहिम अमित ठाकरे, वरळी संदीप देशपांडे यांचा यात समावेश आहे. 

ट्रेंडिंग बातमी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासात 52 कोटीची मालमत्ता जप्त

यावरून भाजपची रणनिती स्पष्ट होत आहे. भाजप कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. सत्तेत यायचे असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात. जागा कोणत्याही स्थिती कमी होवू नये यासाठी भाजपने आखलेली ही रणनिती आहे. भाजपकडे जे तगडे उमेदवारी होते पण त्यांना पक्ष उमेदवारी देवू शकत नव्हता. अशा वेळी भाजपने आपल्या नेत्यांनाच मित्र पक्षात पाठवले आहे. निवडून येणाची क्षमता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी द्या असा आग्रह भाजपचा होता. त्यामुळे विद्यमान आमदार जरी राष्ट्रवादी किंवा सेनेचे असतील तरी त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार तगडा असेल अशा ठिकाणी भाजपने आपल्या नेत्यांना मित्र पक्षात पाठवले आहेत. त्यातून मित्रपक्षाकडे सक्षम उमेदवार नसेल तर तो पुरवण्याचे कामच भाजपने या माध्यमातून केले आहे.    

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत गणेश नाईंकाचा गेम होणार? गल्ली ते दिल्ली सुत्र फिरली, भाजपला ही फटका?

त्याच बरोबर राष्ट्रवादीला महायुतीत घेतल्याने भाजपचे अनेक स्थानिक नेते नाराज आहेत. त्यामुळे जिथे अजित पवारांचे उमेदवार असतील तिथे भाजपकडून बंडखोरीची दाट शक्यता होती. ही बंडखोरी शमवण्यासाठीही भाजपने ही एक शक्कल लढवली आहे. त्यामुळे अजित पवार गटालाही दोन पावलं मागे घेत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. जर तसे केले नसते तर त्याचा फटका कदाचित अजित पवारांनाही बसला असता. या सर्व गोष्टी लक्षात घेता अजित पवारांवर भाजपच्याच नेत्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याची वेळ आली आहे.