शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे अनेक मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे. विधानसभेच्या 26 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि 12 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष फुटीनंतर कधी एकत्र काम केलेले कार्यकर्ते आणि नेते एकमेकाच्या विरोधात ठाकणार आहेत. त्यामुळे या मतदार संघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केली होती. तर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात मात्र चांगलीच चुरस पाहायला मिळाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारी पाहाता 26 मतदार संघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे असा थेट सामना होणार आहे. या मतदार संघात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. शिवसेना कुणाची हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या लढतीच्या निकालातून तो महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात पाहायला मिळणार आहे. इथे ठाकरे गटाचे केदार दिघे शिवसेना शिंदे गटाच्या एकनाथ शिंदेंना आव्हान देतील. अन्य लढती या पुढील प्रमाणे असतील.
ओवळा माजिवडा
उबाठा : नरेश मणेरा
शिंदेसेना : प्रताप सरनाईक
मागाठणे
उबाठा : अनंत (बाळा) नर
शिंदेसेना : मनिषा वायकर
कुर्ला
उबाठा : प्रविणा मोरजकर
शिंदेसेना : मंगेश कुडाळकर
माहिम
उबाठा : महेश सावंत
शिंदेसेना : सदा सरवणकर
महाड
उबाठा : स्नेहल जगताप
शिंदेसेना : भरत गोगावले
राधानगरी
उबाठा : के. पी. पाटील
शिंदेसेना : प्रकाश आबिटकर
राजापूर
उबाठा : राजन साळवी
शिंदेसेना : किरण सामंत
सावंतवाडी
उबाठा : राजन तेली
शिंदेसेना : दीपक केसरकर
कुडाळ
उबाठा : वैभव नाईक
शिंदेसेना : निलेश राणे
रत्नागिरी
उबाठा : सुरेंद्रनाथ (बाळ) माने
शिंदेसेना : उदय सामंत
दापोली
उबाठा : संजय कदम
शिंदेसेना : योगेश कदम
पाटण
उबाठा : हर्षद कदम
शिंदेसेना : शंभूराज देसाई
सांगोला
उबाठा : दीपक आबा साळुंखे
शिंदेसेना : शहाजी बापू पाटील
परांडा
उबाठा : राहुल ज्ञानेश्वर पाटील
शिंदेसेना : तानाजी सावंत
कर्जत
उबाठा : नितीन सावंत
शिंदेसेना : महेंद्र थोरवे
मालेगाव बाह्य
उबाठा : अद्वय हिरे
शिंदेसेना : दादा भुसे
नांदगाव
उबाठा : गणेश धात्रक
शिंदेसेना : सुहास कांदे
वैजापूर
उबाठा : दिनेश परदेशी
शिंदेसेना : रणेश बोरणारे
संभाजीनगर पश्चिम
उबाठा : राजू शिंदे
शिंदेसेना : संजय शिरसाठ
संभाजीनगर मध्य
उबाठा : किशनचंद तनवाणी
शिंदेसेना : प्रदीप जैस्वाल
सिल्लोड
उबाठा : सुरेश बनकर
शिंदेसेना : अब्दुल सत्तार
कळमनुरी
उबाठा : डॉ. संतोष टाळफे
शिंदे सेना : संतोष बांगर
रामटेक
उबाठा : विशाल बरबटे
शिंदेसेना :आशिष जैस्वाल
मेहकर
उबाठा : सिद्धार्थ खरात
शिंदेसेना : संजय पायमुलकर
पाचोरा
उबाठा : वैशाली सूर्यवंशी
शिंदेसेना : किशोर धनसिंग पाटील
या शिवाय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना रंगणार आहे. आतापर्यंत ज्या उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत त्याच जवळपास 12 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होणार आहेत. त्यात बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. तर अहेरीत धर्माराव अत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात थेट लढत होणार आहे. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे हे एकमेकांच्या समोर ठाकले आहेत. त्यामुळे या 12 मतदार संघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
बारामती
अजित पवार (AP)
युगेंद्र पवार (SP)
अहेरी
धर्माराव अत्राम (AP)
भाग्यश्री आत्राम (SP)
इंदापूर
दत्तात्रय भरणे (AP)
हर्षवर्धन पाटील (SP)
कागल
हसन मुश्रीफ (AP)
समरजित घाटगे(SP)
आंबेगाव
दिलीप वळसे (AP)
देवदत्त निकम(SP)
मुंब्रा
नजीब मुल्ला(AP)
जितेंद्र आव्हाड(SP)
वडगाव शेरी
सुनील टिंगरे(AP)
बापूसाहेब पठारे(SP)
वसमत
चंद्रकांत नवघरे(AP)
जयप्रकाश दांडेगावकर(SP)
हडपसर
चेतन तुपे(AP)
प्रशांत जगताप(SP)
चिपळूण
शेखर निकम(AP)
प्रशांत यादव(SP)
कोपरगाव
आशुतोष काळे(AP)
संदीप वर्पे(SP)
उदगीर
संजय बनसोडे(AP)
सुधाकर भालेराव(SP)
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. त्यानंतर होणारी विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे जनाधार कोणत्या गटाला आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. शिवाय कार्यकर्तेही कोणत्या गटात जास्त आहेत हे सही समोर येणार आहे. त्यामुळे दोन्ही गट ताकदीने मैदानात उतरतील यात शंका नाही. लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शरद पवार गट वरचढ ठरला होता. तीच कामगिरी करण्याचे आव्हान आता या दोन्ही पक्षांकडे असेल. तर शिंदे आणि अजित पवारांना आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world