रक्षा खडसें समोर पेच? महायुतीचा प्रचार करणार की नणंद रोहिणी खडसेंना पाठिंबा देणार?

रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या निवडणुकीत त्यांची नणंद रोहिणी खडसे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. तर रक्षा खडसे या महायुतीत आहे. त्या भाजपच्या खासदार आणि मंत्री ही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भाजप बरोबरच महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे. अशात त्या आपल्या नणंद रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर रक्षा खडसे यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहेत. त्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा एकनाथ खडसे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शिवाय रोहिणी खडसे यांनी ही मतदार संघात आपल्या कार्यकर्त्यांचे चांगले जाळे विणले आहे. अशा वेळी त्यांच्या वहीनी रक्षा खडसे त्यांना मदत करणार की नाही याबाबत सध्या मतदार संघात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकी वेळी रक्षा खडसे यांचा प्रचार एकनाथ खडसे यांनी केला होता. तर रोहिणी खडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच प्रचार केला होता. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - बाळासाहेब थोरातांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

या सर्व गोष्टी पाहात रक्षा खडसे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी घरगुती वाद आहेत असे रक्षा खडसे म्हणाल्या आहे. पण जरी वाद असले तरी तो विषय बाजूला ठेवून महायुतीचे उमेदवार म्हणून  महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करणार असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्या आधीच ते आपण त्यांचा प्रचार करणार नाही असे सांगत आहेत असंही रक्षा खडसे म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

आपण भाजपची कार्यकर्ता आहे. त्यामुळे महायुती म्हणूनच आपण उमेदवारांचा प्रचार करणार आहोत असंही त्या म्हणाल्या. पक्षाने दिलेला आदेश मी नक्कीच पाळणार आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. मुक्ताईनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते हेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.  त्यामुळे आपल्या प्रचाराबाबत चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंवर शंका उपस्थित केली होती. त्यावर रक्षा खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीचे उमेदवार जिथे आहेत त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावेल असेही त्या म्हणाल्या. बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन यांच्याकडूनही प्रयत्न सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.  

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज

मुक्ताईनगरमध्ये नणंद भावजईचे समिकरण नवे नाही असं त्या म्हणाल्या. लोकसभेत रोहीणी खडसे यांनी माझ्या विरोधात प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत  मी माझ्या पक्षाचं काम करणार आहे. रोहिणी खडसे त्यांच्या पक्षाचे काम करतील. महायुतीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.  त्यांना निवडून आणायचे आहे असंही त्या म्हणाल्या. दरम्यान नाथाभाऊंनी कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी माझ्याबद्दल बोलू शकते. मात्र नाथाभाऊंच्या निर्णयाबाबत नाथाभाऊ सांगू शकतात असंही त्यांनी सांगितलं.