6 months ago
मुंबई:

देशाच्या 18 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान पार पडलं. अखेर आज निकालाची प्रतीक्षा संपली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रात कोण जिंकणार याचा निकाल थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीचा निकालाचा अंदाज बांधणं भल्याभल्यांनाही जमत नव्हतं. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान पार पडलं. महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीमधील लढतीत महाराष्ट्रातील नागरिकांना कोण अपील होणार, हे लवकरच समोर येईल.

या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, सुजय विखे पाटील, सुनैत्रा पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, नवनीत राणा, उदयनराजे भोसले यांना या निवडणुकीत यश मिळणार का, याकडे सर्वांचच लक्ष आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमुरमध्ये सर्वाधिक 71.88 % मतदार पार पडलं आहे. तर सर्वात कमी मतदान मुंबई दक्षिणमध्ये 50.06 टक्के इतके झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील घडामोडींमुळे येथील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शंभरच्या जवळपास सभा एकट्या महाराष्ट्रात झाल्या. त्यामुळे महाराष्ट्राचा विजय भाजपसाठीही प्रतिष्ठेचा ठरला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल समोर येईल. यानंतर उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट की मोदींचा चेहरा जिंकेल हे स्पष्ट होईल.    

Jun 04, 2024 20:20 (IST)

बीड निकालावरुन शरद पवारांचं पोलीस महासंचालकांना आवाहन

Jun 04, 2024 20:13 (IST)

सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयाचा अनोखा जल्लोष, जेसीबीने 21 फुटी पुष्पहार घालून गुलाल उधळत आनंद साजरा

सांगली लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाल्यानंतर मिरजेत जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय तसेच बंडखोर भाजपचे निरंजन आवटी यांनी नूतन खासदार विशाल पाटील यांचे मिरज शहरात जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीने गुलालाची उधळण करून विजयाचा आनंद साजरा केला. विशाल पाटील यांनी मिरजेत महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुरेश बापू आवटी युवा मंच तर्फे सुमारे 21 फुटी पुष्पहार घालून विशाल पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गुलाल उधळल्याने महात्मा गांधी चौक पूर्ण गुलालमय झाला होता. विशाल पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा पराभव केल्याने मिरज पॅटर्नमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jun 04, 2024 20:06 (IST)

आता केवळ एकच मतदारसंघाचा निकाल शिल्लक, भाजप की शरद पवार गट; कोण जिंकणार?

आता केवळ एकच मतदारसंघाचा निकाल शिल्लक, भाजप की शरद पवार गट; कोण जिंकणार?

भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या बीड मतदारसंघाचा निकाल अद्याप समोर आला नाही. या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी सुरू आहे. येथे पंकजा मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे लढत देत आहेत. आव्हानात्मक राहिलेल्या या मतदारसंघात कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी सर्वजणं उत्सुक आहेत. 

Jun 04, 2024 20:06 (IST)

आता केवळ एकच मतदारसंघाचा निकाल शिल्लक, भाजप की शरद पवार गट; कोण जिंकणार?

आता केवळ एकच मतदारसंघाचा निकाल शिल्लक, भाजप की शरद पवार गट; कोण जिंकणार?

Advertisement
Jun 04, 2024 19:35 (IST)

तुमचा खासदार कोण? महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाचा निकाल वाचा एकाच क्लिकवर

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल, पाहा कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकलं?

१.दक्षिण मुंबई -  अरविंद सावंत (विजयी) 

२.दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (विजयी) 

३.उत्तर मुंबई-  पियुष गोयल (विजयी) 

४.उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी) 

५.उत्तर पश्चिम मुंबई- अमोल किर्तीकर (विजयी) 

६.ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (विजयी) 

७.ठाणे- नरेश म्हस्के (विजयी) 

८.कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (विजयी)  

९.भिवंडी- सुरेश म्हात्रे (विजयी)

१०.पालघर – डॉ. हेमंत सावरा (विजयी) 

११.रायगड – सुनिल तटकरे (विजयी)

१२.रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (विजयी) 

-----------------------

१३.मावळ – श्रीरंग बारणे (विजयी 

१४.पुणे – मुरलीधर मोहोळ (विजयी) 

१५ शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (विजयी)

१६.बारामती – सुप्रिया सुळे (विजयी) 

१७.माढा - धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट)

१८.सोलापूर – प्रणिती शिंदे (विजयी) 

१९.कोल्हापूर – छ. शाहू महाराज (विजयी) 

२०.सांगली – विशाल पाटील (विजयी) 

२१.सातारा - उदयनराजे भोसले (विजयी)

२२. हातकणंगले - धैर्यशील माने (विजयी)

२३.रामटेक – श्यामकुमार बर्वे (विजयी) 

२४.नागपूर – नितीन गडकरी (विजयी)

२५.भंडारा-गोंदिया - 

२६-गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी) 

२७.चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर (विजयी)

२८.बुलढाणा - प्रतापराव जाधव (विजयी) 

२९-अकोला – अनुप धोत्रे (विजयी) 

३०.अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी) 

३१.वर्धा – अमर काळे (विजयी) 

३२. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी) 

-------------------

३३.हिंगोली - 

३४.नांदेड – वसंत चव्हाण (विजयी) 

३५.परभणी – नागेश आष्टीकर (विजयी) 

३६.संभाजीनगर – संदीपान भुमरे (विजयी) 

३७. बीड - 

३८. जालना – कल्याण काळे (विजयी) 

३९. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (विजयी) 

४०. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (विजयी) 

------------

४१.नाशिक – राजाभाऊ वाजे (विजयी) 

४२.नंदुरबार –गोवाल पाडवी (विजयी) 

४३.जळगाव – स्मिता वाघ (विजयी) 

४४.रावेर – रक्षा खडसे (विजयी) 

४५.धुळे – शोभा बच्छाव (विजयी) 

४६.दिंडोरी – भास्कर भगरे (विजयी) 

४७.नगर – निलेश लंके (विजयी) 

४८-शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (विजयी







Jun 04, 2024 19:07 (IST)

बारामती शहरातील त्या बॅनरची जोरदार चर्चा, बारामतीकरांकडून खास संदेश

बारामती शहरामध्ये सध्या एका बॅनर्जी जोरदार चर्चा सुरू आहे. तु-तारी त्याला कोण मारी व समस्त बारामतीकर असा उल्लेख असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व तुतारी वाजवणारी व्यक्ती असा या बॅनरवर फोटो असून त्यासमोरच तु-तारी त्याला कोण मारी व खालच्या बाजूला समस्त बारामतीकर असा उल्लेख या बॅनर वरती करण्यात आलेला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या तीन हत्ती चौकातील या बॅनरची सध्या बारामतीत जोरदार चर्चा रंगली आहे. 

Advertisement
Jun 04, 2024 17:55 (IST)

'आपला माणूस' जिंकला, शेतकऱ्याचा लेक निलेश लंकेंची दिल्लीवारी निश्चित

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके 3,82,576 मतांनी विजयी झाली आहे. त्यांच्याविरोधात दुसऱ्यांदा खासदारकी लढवणारे सुजय विखे पाटील पराभूत झाले आहेत. त्यांना 3,67,779 मतं मिळाली आहे. विखे पाटील 14,797 मतांनी विजयी झाले आहेत.    

Jun 04, 2024 16:45 (IST)

इंडिया आघाडी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांशी संपर्क करणार? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

Advertisement
Jun 04, 2024 15:40 (IST)

आतापर्यंत आघाडीवर असलेल्या सुजय विखे पाटलांना धक्का...

आतापर्यंत आघाडीवर असलेल्या सुजय विखे पाटलांना धक्का...

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील 210521 जागांवर आहेत. तर या फेरीत निलेश लंके यांनी उसळी घेत 2,16,702 मतांसह आघाडी घेतली आहे.  

Jun 04, 2024 15:21 (IST)

महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर, काँग्रेस की भाजप कोणाला धक्का?

महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा झटका बसला आहे. कारण भाजपच्या दोन वेळा खासदार हीना गावित यांना पराभवाचा धक्का बसला आहे.काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने नंदुरबारमधून विजयाचा गुलाल उधळला आहे.

Jun 04, 2024 15:18 (IST)

निकालाचे कल समोर आल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या निकालाचे कल समोर आल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका...

Jun 04, 2024 14:32 (IST)

बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Jun 04, 2024 14:09 (IST)

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके 11 व्या फेरीअंती 10462 मतांनी आघाडीवर

अहमदनगरमधून महत्त्वाची बातमी..

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार सुजय विखे यांना धक्का, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके 11 व्या फेरीअंती 10462 मतांनी आघाडीवर...

Jun 04, 2024 13:30 (IST)

उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी

उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी

महायुती ३ जागांवर आघाडी, महाविकासआघाडी ५ जागांवर आघाडी

नाशिक - 

राजाभाऊ वाजे - ठाकरेंची सेना आघाडी

हेमंत गोडसे - शिंदेंची शिवसेना पिछाडीवर

दिंडोरी - 

भास्कर भगरे - पवारांची राष्ट्रवादी आघाडी 

डॉ भारती पवार - भाजप पिछाडीवर

अहमदनगर - 

सुजय विखे - भाजप आघाडीवर

निलेश लंके - पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर

धुळे - 

डॉ सुभाष भामरे - भाजप पिछाडीवर

शोभा बच्छाव - काँग्रेस आघाडीवर

जळगाव - 

स्मिता वाघ - भाजप आघाडी 

करण पवार - ठाकरेंची शिवसेना पिछाडीवर

रावेर - 

रक्षा खडसे - भाजप आघाडीवर 

श्रीराम पाटील - पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर

नंदुरबार - 

गोवाल पाडवी - काँग्रेस आघाडीवर

डॉ हिना गावीत - भाजप पिछाडीवर

शिर्डी - 

भाऊसाहेब वाघचौरे - ठाकरेंची सेना आघाडीवर 

सदाशिव लोखंडे - शिंदेंची शिवसेना पिछाडीवर

Jun 04, 2024 12:59 (IST)

औरंगाबादमध्ये संदिपान भुमरे 14,656 मतांनी आघाडीवर

संभाजीनगर :

संदिपान भुमरे (शिवसेना) - 142572

इम्तियाज जलील (MIM) - 127916

चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) - 92031

संदिपान भुमरे हे 14,656 मतांनी आघाडीवर

Jun 04, 2024 12:23 (IST)

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा जल्लोष, जोरदार घोषणाबाजी करीत व्यक्त केला आनंदोत्सव

नाशिकमधून महत्त्वाची बातमी 

नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंची 14 फेरी अखेर 1 लाख 47 हजाराची आघाडी

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा जल्लोष, जोरदार घोषणाबाजी करीत व्यक्त केला आनंदोत्सव. 

Jun 04, 2024 12:02 (IST)

उद्धव ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची 1 लाख 4 हजार 125 मतांची आघाडी

धाराशिव 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची 1 लाख 4 हजार 125 मतांची आघाडी 

10 व्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांची विक्रमी मतांची लीड.  

ओमराजे यांना 2 लाख 40 हजार मते तर अर्चना पाटील यांना 1 लाख 36 हजार मते 

ओमराजे यांच्या कार्यकर्ते यांचा जल्लोष सुरू झाला आहे.

Jun 04, 2024 11:47 (IST)

Jun 04, 2024 11:43 (IST)

ठाणेकरांची पसंती कोणाली, कोण आघाडीवर?


शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के 62 हजार मतांनी आघाडीवर...

Jun 04, 2024 11:31 (IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा

भाजप  - 11 / 28

शिंदेंची शिवसेना - 6/15

अजित पवार गट - 1/4

शरद पवार गट -  8/10

उद्धव ठाकरे गट - 10/21

काँग्रेस -  11/17

Jun 04, 2024 11:06 (IST)

लोकसभा निवडणुकीचे अपडेट; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर

Jun 04, 2024 10:50 (IST)

बारामतीत कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?

बारामतीत काय आहे स्थिती, जाणून घ्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली

Jun 04, 2024 10:36 (IST)

चौथ्या फेरीनंतरही पिछाडी, नवनीत राणांचा हनुमानाकडे धावा; अमरावतीच्या हनुमान गडी येथे दाखल

चौथ्या फेरीनंतरही पिछाडी, नवनीत राणांचा हनुमानाकडे धावा; अमरावतीच्या हनुमान गडी येथे दाखल

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे 332 मतांनी आघाडीवर तर नवनीत राणा पिछाडीवर...

अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व पती आमदार रवी राणा काही वेळापूर्वीच अमरावतीच्या हनुमान गडी येथे दाखल झाले. नवनीत राणा व रवी राणा यांनी हनुमानांच्या निर्मानाधीन पुतळ्याची पूजाअर्चा केली. याच परिसरात त्यांनी हनुमान चालीसा पाठ सुरू केला आहे. 

अमरावती

पहिली फेरी

नवनीत राणा     1707

बळवंत वानखडे 5246

दिनेश बूब         :121

दुसरी फेरी

नवनीत राणा     5408

बळवंत वानखडे 9852

दिनेश बूब         :1055

बळवंत वानखडे 4444 मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी

नवनीत राणा - 17795

बळवंत वानखडे - 20690

दिनेश बूब - 4876

बळवंत वानखडे 2895 मतांनी आघाडीवर

चौथी फेरी

नवनीत राणा - 22795

बळवंत वानखडे - 26117

दिनेश बूब - 5490

Jun 04, 2024 10:31 (IST)

अकोल्यात अँटी इन्क्म्बन्सीचा फटका? अनुप धोत्रे दुसऱ्या तर अभय पाटील आघाडीवर

धारशिवमध्ये तिसऱ्या फेरी अखेर 37 हजार 124 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी

अकोल्यात पाचव्या फेरीत अखेर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील 2983 मतांनी आघाडीवर आहे. भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर असून वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर. 

अभय पाटील : 65452

प्रकाश आंबेडकर : 46186

अनुप धोत्रे : 62469

Jun 04, 2024 10:13 (IST)

नाशिक लोकसभेतून राजाभाऊ वाजे 47 हजार मतांनी आघाडीवर...

सुधीर मुनगंटीवार 19 हजार मतांनी आघाडीवर, 

नाशिक लोकसभेतून राजाभाऊ वाजे 47 हजार मतांनी आघाडीवर...

मुंबईत उद्धव ठाकरे गटाच्या सहापैकी चार आमदार आघाडीवर...

अरविंद सावंत 

संजय दिना पाटील

अनिल देसाई

अमोल कीर्तिकर

Jun 04, 2024 10:04 (IST)

पंकजा मुंडे पिछाडीवर, सुनेत्रा पवार आणि नितीन गडकरी आघाडीवर

Jun 04, 2024 09:54 (IST)

पुणे लोकसभा मतमोजणीचे आतापर्यंतचे कल

पुणे लोकसभा मतमोजणी

वडगाव शेरी - मोहोळ - ६५८५ तर धंगेकर - ४३०१

शिवाजीनगर - ३२४३ - ४०३२

कोथरुड - ७९३१ - २६८५

पर्वती - ३८९४ - ४२९४

कसबा - ४६०४ - ५१९२

कँटमेंट. - ३११२ - ४१००

एकूण. - २९३६९ - २४६०४

मोहोळ यांची आघाडी - ४७६५

Jun 04, 2024 09:52 (IST)

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

भाजप - 10

शिवसेना - 10

राष्ट्रवादी - 2

शिवसेना उबाठा - 7

राष्ट्रवादी शरद पवार - 6

काँग्रेस - 8

एमआयएम - 1

अपक्ष - 1

Jun 04, 2024 09:31 (IST)

काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून उभे राहिलेले सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील 13 हजार 800 मतांनी आघाडीवर. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर ..

Jun 04, 2024 09:00 (IST)

लोकसभा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्रातून कोण पुढे कोण मागे?

लोकसभा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोण पुढे कोण मागे?

रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर

साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर

पहिल्या फेरीत 

भाजपच्या रक्षा खडसे यांना 10833 मतं

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना 7614 मतं

पहिल्या फेरीमध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शाहू छत्रपती 1046 मतनी आघडीवर

यवतमाळ वाशिममध्ये मविआचे संजय देशमुख आघाडीवर, त्यांनी 3276 मतांची आघाडी घेतली आहे. राळेगाव कारंजा यवतमाळ या तीन विधानसभामध्ये आघाडी संजय देशमुखांची आघाडी

अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील 2500 मतांनी आघाडीवर. भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर.

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावतीतून आघाडीवर, काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा जल्लोष..

Jun 04, 2024 08:49 (IST)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मुसंडी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मुसंडी

मविआ 23 जागांवर, महायुती 18 जागांवर

Jun 04, 2024 08:36 (IST)

सांगली लोकसभेच्या मतमोजणीला 25 मिनिट उशिराने सुरुवात...

सांगली लोकसभेच्या मतमोजणीला 25 मिनिट उशिराने सुरुवात...

Jun 04, 2024 08:33 (IST)

भाजपला मोठा धक्का! नवनीत राणा पिछाडीवर, बळवंत वानखडे आघाडीवर

भाजपला मोठा धक्का! नवनीत राणा पिछाडीवर, बळवंत वानखडे आघाडीवर

Jun 04, 2024 08:30 (IST)

ठाकरे गटाचे 10 उमेदवार, तर भाजपचे 9 उमेदवार आघाडीवर...

ठाकरे गटाचे 10 उमेदवार, तर भाजपचे 9 उमेदवार आघाडीवर...

Jun 04, 2024 08:20 (IST)

आतापर्यंत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, वाचा एका क्लिकवर

आतापर्यंत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, एका क्लिकवर वाचा

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर

रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर 

मंडीमधून कंगना रणौत पिछाडीवर

दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर

ईशान्य मुंबईतून दीना पाटील आघाडीवर

पालघरमधून भारती कामडी आघाडीवर

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आघाडीवर

Jun 04, 2024 08:13 (IST)

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर...

Jun 04, 2024 08:11 (IST)

जालन्यातून रावसाहेब दानवे आघाडीवार...

Jun 04, 2024 08:10 (IST)

महाराष्ट्रात महायुतीला दोन जागांवर आघाडी

महाराष्ट्रात महायुतीला दोन जागांवर आघाडी

Jun 04, 2024 08:08 (IST)

देशभरात मतमोजणीला सुरुवात...

देशभरात मतमोजणीला सुरुवात...

Jun 04, 2024 08:08 (IST)

201 किलोचे लाडू... 11 वेगवेगळे प्रकार... विजया आधीच जल्लोषाची तयारी

छत्तीसगड भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त करत तब्बल 201 किलो लाडू तयार ठेवले आहे. शिवाय त्यात 11 वेगवेगळ्या प्रकराचे हे लाडू आहेत.

Jun 04, 2024 07:56 (IST)

मतमोजणीच्या आधी नारायण राणे गणपतीपुळ्याच्या चरणी लीन

रत्नागिरी- नारायण राणे यांनी सपत्नीक गणपतीपुळ्यातील गणरायांचं दर्शन घेतलं. मतमोजणीच्या आधी नारायण राणे गणपतीपुळ्याच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं.

Jun 04, 2024 07:55 (IST)

पालघरमध्ये पत्रकाराना बंदिस्त ठेवल्याने पत्रकारांमध्ये मोठी नाराजी

पालघरमध्ये निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी पडद्याआड ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. पत्रकारांसाठी बनवलेले पत्रकार कक्ष चारही बाजूने बंदिस्त ठेवण्यात आले आहे. पत्रकाराना बंदिस्त ठेवल्याने पत्रकारांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

Jun 04, 2024 06:47 (IST)

वाहनांची कडक तपासणी, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होईल. जिल्हा प्रशासनाच्यावतीने टॉप स्कॉड श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

Jun 04, 2024 06:39 (IST)

सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात...

आज सकाळी 8 वाजल्यापासून  राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या मत मोजणीला सुरूवात होणार आहे. सर्वप्रथम दहा टेबलावीरल पोस्टल मतं मोजली जाणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी विधानसभा निहाय 84 टेबलांवरील मतमोजणीला सुरुवात होईल. 

Jun 04, 2024 06:22 (IST)

सुरक्षेसाठी रात्रभर पोलिसांकडून बंदोबस्त

आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याकारणाने रात्रीच्या वेळेत रात्रभर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेण्यात आली. 

Jun 04, 2024 06:08 (IST)

काय असेल महाराष्ट्राचा कल, थोड्याच वेळात येणार समोर.....

काय असेल महाराष्ट्राचा कल, थोड्याच वेळात येणार समोर.....