जाहिरात

201 किलोचे लाडू... 11 वेगवेगळे प्रकार... विजया आधीच जल्लोषाची तयारी

छत्तीसगड भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त करत तब्बल 201 किलो लाडू तयार ठेवले आहे. शिवाय त्यात 11 वेगवेगळ्या प्रकराचे हे लाडू आहेत.

201 किलोचे लाडू... 11 वेगवेगळे प्रकार... विजया आधीच जल्लोषाची तयारी
रायपूर:

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरूवात होणार आहे. मात्र त्या आधीच भारतीय जनता पक्षाने विजयाचा जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. छत्तीसगड भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त करत तब्बल 201 किलो लाडू तयार ठेवले आहे. शिवाय त्यात 11 वेगवेगळ्या प्रकराचे हे लाडू आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होणार हे  सांगण्यात आले होते. त्यामुळे भाजपने विजयाच्या आधीच जल्लोषाची तयारी केल्याचे चित्र छत्तीसगडमध्ये पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा - LIVE Election Results 2024: भाजपने खाते उघडले, सुरतमधील जागा जिंकली

आम्ही 201 किलो लाडूंची ऑर्डर दिली आहे. त्यात 11 प्रकारचे वेगवेगळे लाडू आहेत. हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना वाटणार आहोत. सकाळपासून त्याची सुरूवात होईल.. रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही लाडू वाटणार आहोत. असे भाजपचे छत्तीसगडचे कार्यकर्ते ललीत सिंह यांनी सांगितले. 

हेही वाचा - महाराष्ट्राची गॅरेंटी कुणाला? वाचा तुमच्या मतदारसंघातील संपूर्ण विश्लेषण

हे लाडू विजयासाठी असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक विजय हा आम्ही अशाच पद्धतीने साजरा करत असतो असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय लोकसभेत होईल. चारशे पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असेही सिंह म्हणाले. मोदींच्या नेतृत्वार देशाचा विश्वास आहे असे ही ते म्हणाले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?
201 किलोचे लाडू... 11 वेगवेगळे प्रकार... विजया आधीच जल्लोषाची तयारी
Devotees risking their lives for Ganesh Visarjan near kalyan thakurli
Next Article
Ganesh Visarjan : कल्याणमधील जीवघेणं गणेश विसर्जन, असा द्यावा लागतो बाप्पाला निरोप