राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची अपडेटेड आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला कमी वाटणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. 7 मे रोजी सायंकाळपर्यंत महाराष्ट्रात मतदानाचा आकडा 54.09 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नव्या आकडेवारीनुसार यामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नव्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सायंकाळपर्यंत अंदाजे 61.44 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात ( 7 मे) सुरुवातील मतदारांचा प्रतिसाद फारसा दिसून आला नाही. मात्र हळूहळू लोकांचा ओघ वाढला. धाराशिव, हातकणंगले आणि इंदापूर या भागात काही वादावादीच्या घटना घडल्या. तर सांगोल्यात एका व्यक्तीने EVM जाळल्याची घटना घडली होती.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात अंदाजे 63.70 टक्के मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यात कमालीचा निरूत्साह दिसून आला आणि ही टक्केवारी 53.70 टक्क्यांपर्यंत घसरली होती. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात थोडी वाढ पाहायला मिळत असून हा आकडा 61.44 पर्यंत पोहोचला आहे.
नक्की वाचा - शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रायगड – 58.10 टक्के
बारामती – 56.07 टक्के
उस्मानाबाद – 60.91 टक्के
लातूर – 60.18 टक्के
सोलापूर – 57.61 टक्के
माढा – 62.17 टक्के
सांगली – 60.95 टक्के
सातारा – 63.05 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 59.23 टक्के
कोल्हापूर – 70.35 टक्के
हातकणंगले – 68.07 टक्के