Election 2026 :मुख्यमंत्री दावोसवरून येताच सत्तेचा तिढा सुटणार; KDMC, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये हालचालींना वेग

Maharashtra Municipal Corporation Election 2026:  ठाणे जिल्हयातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Election 2026:  महायुतीमधील घटक पक्षांनी या तिन्ही महानगरपालिकांमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे.
मुंबई:

Maharashtra Municipal Corporation Election 2026:  ठाणे जिल्हयातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. या तिन्ही शहरांमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी या तिन्ही महानगरपालिकांमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रितपणे बसून महानगरपालिकांच्या सत्तावाटपाचा आणि महापौर निवडीचा अंतिम निर्णय घेणार आहेत. या बैठकीनंतरच सत्तेचे नेमके समीकरण अधिक स्पष्ट होईल.

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : ऐतिहासिक वचपा! चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनी भाजपाचाच करेक्ट कार्यक्रम केला? )

महायुतीची रणनीती आणि पूर्वतयारी

या तिन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हालचाली सुरू होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या आठवड्यातच या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे.

या भेटीदरम्यान कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तिन्ही शहरांच्या स्थानिक राजकारणावर विचारमंथन करण्यात आले. महायुतीमधील समन्वय टिकवून ठेवत तिन्ही ठिकाणी आपलाच महापौर कसा निवडून येईल, यावर दोन्ही नेत्यांनी एकमत केले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती!)

जनादेशाचा सन्मान करण्याचा निर्धार

रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, या तिन्ही महानगरपालिकांच्या क्षेत्रात जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. निवडणुकीत मिळालेला हा जनादेश महायुतीच्या बाजूने असल्याने, लोकशाहीच्या नियमानुसार आणि जनतेच्या इच्छेनुसार या शहरांचा कारभार महायुतीकडेच असायला हवा. त्यामुळे तिन्ही शहरात महायुतीचेच शासन येणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री परतल्यानंतर होणाऱ्या बैठकीत केवळ औपचारिक घोषणा आणि प्रक्रियेवर चर्चा होणे बाकी आहे.