Maharashtra Municipal Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 2017 नंतर तब्बल 9 वर्षांनी राज्यात महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुका खास आहेत.
गेल्या 9 वर्षात बदललेल्या राजकारणाचे पडसाद महापालिका निवडणुकीतही उमटले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. या बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न या पक्षाकडून सुरु होते. त्यामधील काही ठिकाणी पक्षांना यश आले. पण, अद्यापही अनेक मतदारसंघात प्रमुख उमेदवारांसह बंडखोरही रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
निवडणुकीची चुरस वाढलेली असतानाच बिनविरोध उमेदवारही मोठ्या प्रमाणात विजयी झालेत. याचा मोठा फायदा सत्तारुढ भाजपा आणि शिवसेना युतीला मिळालाय. राज्यभरातून भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर इस्लामिक पार्टी आणि अपक्ष प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झालाय.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण? )
कोणत्या महापालिकेत किती विजयी उमेदवार?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक 20 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.त्यापाठोपाठ जळगावमध्ये 12 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. तर ठाणे आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 7 उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारलीय.
भिवंडीमध्ये 8, धुळे 4 तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत 5 उमेदवार विजयी झालेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रत्येकी 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
प्रत्येक मतदारसंघातील बिनविरोध विजयी उमेदवार कोण आहेत ते पाहूया
पुणे महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 35 - मंजुषा नागपुरे - भाजपा
प्रभाग क्रमांक 35 - श्रीकांत जगताप - भाजपा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 6 ब - रवी लांडगे - भाजपा
प्रभाग क्रमांक 10 ब - सुप्रिया महेश चांदगुडे - भाजपा
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब )
पनवेल महानगपालिकेत भाजपाचे तब्बल 7 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेलमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सात उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे हे सर्व उमेदवार विजयी झाले.
पनवेल महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
नितीन पाटील
रुचिता लोंढे
अजय बहिरा
दर्शना भोईर
प्रियंका कांडपिळे
ममता प्रितम म्हात्रे
स्नेहल ढमाले
ठाणे महापालिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची असलेली पकड पुन्हा एकदा जाणवली आहे. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.
ठाणे महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 5 (वर्तक नगर) - जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण
प्रभाग क्रमांक 14 (सावरकरनगर ) - शीतल ढमाले
प्रभाग क्रमांक 17 (किसननगर) - एकता भोईर
प्रभाग क्रमांक 18 (वागळे इस्टेट) - जयश्री फाटक, सुखदा मोरे, राम रेपाळे
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेत भाजपाचे 6 तर शिवसेनेचे 2 असे एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )
भिवंडी महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 16 अ - सुरेश चौगुले - भाजपा
वार्ड क्रमांक 18 ब - दीपा मढवी - भाजपा
वार्ड क्रमांक 18 क - अबू साद लल्लन - भाजपा
वार्ड क्रमांक 18 अ - अश्विनी फुटाणकर - भाजपा
वार्ड क्रमांक 23 ब - भारती हनुमान चौधरी - भाजपा
वार्ड क्रमांक 17 - सुमित पाटील - भाजपा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 26 क - असावरी नवरे
प्रभाग क्रमांक 26 ब - रंजना पेणकर
प्रभाग क्रमांक 18 अ - रेखा चौधरी
प्रभाग क्रमांक 27 अ - मंदा पाटील
प्रभाग क्रमांक 26 अ - विशू पेडणेकर
प्रभाग क्रमांक 19 क - साई शेलार
प्रभाग क्रमांक 27 ड - महेश पाटील
प्रभाग क्रमांक 23 अ - दीपेश म्हात्रे
प्रभाग क्रमांक 23 क - हर्षदा भोईर
प्रभाग क्रमांक 23 ड - जयेश म्हात्रे
प्रभाग क्रमांक 19 ब - डॉ. सुनिता पाटील
प्रभाग क्रमांक 19 अ - पूजा म्हात्रे
प्रभाग क्रमांक 30 अ - रविना माळी
प्रभाग क्रमांक 24 ब - ज्योती पाटील
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 24 - विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, वृषाली जोशी
प्रभाग क्रमांक 28 अ - हर्षल मोरे
प्रभाग क्रमांक 11 अ - रेश्मा किरण निचळ
प्रभाग क्रमांक 28 ब - ज्योती मराठे
( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )
उत्तर महाराष्ट्रातील धुळे महानगरपालिकेतही भाजपाची घौडदौड सुरु आहे. धुळ्यात भाजपाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
धुळे महानगपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 क - उज्ज्वला रणजित भोसले - भाजपा
प्रभाग क्रमांक 6 - जोत्सना पाटील - भाजपा
प्रभाग क्रमांक 17 - सुरेखा उगले - भाजपा
प्रभाग क्रमांक 17 - अमोल मासुळे - भाजपा
मालेगाव महानगरपालिकेत मतदानापूर्वीच इस्लाम पार्टीनं खातं उघडलं आहे.
मालेगाव महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
मुनीरा शेख फकीर मोहम्मद - इ्स्लाम पार्टी
जळगाव महानगरपालिकेतही महायुतीनं मोठं यश मिळवलंय. या महानगरपालिकेत महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. यामध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी 6 उमेदवारांचा समावेश आहे.
जळगाव महानगपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
उज्ज्वला बेंडाळे - भाजपा
विशाल भोळे - भाजपा
दीपमाळा काळे - भाजपा
अंकिता पाटील - भाजपा
डॉ. विश्वनाथ खडके - भाजपा
वैशाली पाटील - भाजपा
गौरव सोनावणे - शिवसेना
मनोज चौधरी - शिवसेना
रेखा चुडामण पाटील - शिवसेना
प्रतिभा देशमुख - शिवसेना
सागर सोनावणे - शिवसेना
विक्रम सोनावणे - शिवसेना
अहिल्यानगर महानगरपालिकेतही 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपाच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 8 ड - कुमार वाकळे - राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 14 अ - प्रकाश भागानगरे - राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक 7 ब - पुष्पा अनिल बोरुडे - भाजपा
प्रभाग क्रमांक 6 - सोनाबाई तायगा शिंदे - भाजपा
प्रभाग क्रमांक 6 ड - उद्धव कराळे - भाजपा