जाहिरात

Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब

Pune Municipal Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत तब्बल 42 जणांचे तिकीट पक्षानं कापले आहे.

Pune News:  पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब
Pune News: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपानं धक्कातंत्राचा वापर केला आहे.
पुणे:

Pune Municipal Election 2026:  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला मास्टर प्लॅन तयार केला असून यावेळी पक्ष अत्यंत आक्रमक पवित्र्यात असल्याचे दिसत आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लाट थोपवण्यासाठी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजपाने यावेळी कोणाचीही गय न करता अनेक जुन्या नगरसेवकांचे पत्ते कट केले आहेत. या निर्णयामुळे पुणे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपाची पुणे महापालिकेसाठी मोठी रणनीती

पुणे महानगरपालिकेची निवडणूक भाजपाने पूर्ण ताकदीनिशी आणि स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना पक्षाने भाकरी फिरवण्याचे धोरण अवलंबले आहे. तब्बल 42 विद्यमान नगरसेवकांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आपल्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याची खात्री बाळगणाऱ्या अनेक दिग्गजांना पक्षाने मोठा धक्का दिला आहे.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

गुजरात पॅटर्नची पुण्यात पुनरावृत्ती

राजकारणात प्रस्थापितांविरुद्ध असलेली लोकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा अनेकदा धक्कातंत्राचा वापर करते. यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अशाच प्रकारे अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती आणि त्याचा पक्षाला मोठा फायदा झाला होता. विधानसभेच्या वेळीही पक्षाने हा प्रयोग काही प्रमाणात राबवला होता. आता तोच यशस्वी पॅटर्न पुणे महानगरपालिका निवडणुकीत वापरून सत्ता कायम राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान

पक्षाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात तिकीट कापल्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या 42 जणांना उमेदवारी नाकारली आहे, ते आता पक्षासोबत राहतात की बंडखोरीचा झेंडा हाती धरतात, यावर भाजपाच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. या प्रयोगाचा फायदा होणार की फटका बसणार, याचे चित्र 16 जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

( नक्की वाचा : Nagpur News : बंडखोरी नडली, घर फुटलं! भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं नवऱ्याचं घर; नागपुरात मोठी खळबळ )

पुण्यात कोणत्या नगरसेवकांना भाजपानं नाकारली उमेदवारी? वाचा संपूर्ण यादी


ऐश्वर्या जाधव
मारुती सांगळे
आयुब शेख
श्वेता गलांडे-खोसे
मुक्ता जगताप
सुनीता गलांडे
संदीप जराड
सोनाली लांडगे
राजश्री काळे
आदित्य माळवे
सुनीता वाडेकर
अर्चना मुसळे
बंडू ढोरे
स्वप्नाली सायकर
ज्योती कळंबकर
अमोल बालवडकर
श्रद्धा प्रभुणे
हर्षाली माथवड
दीपक पोटे
माधुरी सहस्त्रबुद्धे
जयंत भावे
स्वाती लोखंडे
नीलिमा खाडे
ज्योत्स्ना एकबोटे
राजेश येनपुरे
योगेश समेळ
सुलोचना कोंढरे
विजयालक्ष्मी हरियार
आरती कोंढरे
सम्राट थोरात
मनीषा लडकत
संजय घुले
कविता वैरागे
राजश्री शिळीमकर
प्रवीण चोरबोले
सरस्वती शेंडगे
आनंद रिठे
शंकर पवार
वृषाली चौरे
नीता दांगट
राजश्री नवले
दिशा माने
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com