Congress Candidates Third List :राज्यात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं तिसरी यादी शनिवारी रात्री जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनं यापूर्वी 48 उमेदवारांची पहिली आणि 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यामुळे आता काँग्रेसनं जाहीर केलेल्या एकूण उमेदवारांची यादी 87 झाली आहे.
काँग्रेसमधील नाराजी उघड
काँग्रेसनं जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीमध्ये पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. सावंत यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी हवी होती. पण, त्याऐवजी अंधेरी पश्चिममधून उमेदवारी दिल्यानं ते नाराज झाले आहेत. सावंत यांनी ट्विट करत पक्षानं निर्णय बदलावा ही मागणी केली आहे. सावंत यांनी मागणी केलेला वांद्रे पूर्वचा मतदारसंघ महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (उबाठा) सोडला आहे. वरुण सरदेसाईंना उबाठा पक्षानं उमेदवारी दिली आहे.
मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असं ट्विट सावंत यांनी केली आहे.
महाविकास आघाडी पक्षातील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. काँग्रेसनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जास्त जागा सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कांग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी फक्त हे मत व्यक्त केलं नाही. तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, असं सुत्रांनी सांगितलं.
मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज
काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी
1. राणा सानंदा - खामगाव
2. हेमंत चिमोटे - मेळघाट
3.मनोहर पोरेटी - गडचिरोली
4. दिग्रस - माणिकराव ठाकरे
5. नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे
6.देगलूर - निवृत्तीराव कांबळे
7. मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
8.एजाज बेग - मालेगाव मध्य
9. शिरीष कुमार कोतवाल - चांदवड
10. लकीभाऊ जाधव - इगतपुरी
11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
12. अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
13. वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया
14. तुळजापूर - कुलदीप पाटील
15. कोल्हापूर दक्षिण - राजेश लाटकर
16. सांगली - पृथ्वीराज पाटील