विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांचे 45 शिलेदार ठरले! पाहा संपूर्ण यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. या यादीत 45 जणांचा समावेश आहे. उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बारामतीमध्ये जयंत पाटील यांनी युगेंद्र पवार यांचं नाव जाहीर केलं आहे. युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे काका अजित पवारांशी होणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात बारामती लोकसभा मतदारसंघात लढत झाली होती. त्यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना होणार आहे.

जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड या पक्षातील दिग्गज नेत्यांनाही त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपामधून दाखल झालेले हर्षवर्धन पाटील (इंदापूर), समरजीत घाटगे (कागल) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 

( नक्की वाचा : ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य )

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी

  1. इस्लामपूर - जयंत पाटील
  2. काटोल - अनिल देशमुख
  3. घनसावंगी - राजेश टोपे
  4. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा-कळवा -  जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव - शशिकांत शिंदे
  7. वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव - गुलाबराव देवकर
  9. इंदापूर - हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी - प्राजक्त तनपुरे
  11. शिरूर - अशोकराव पवार
  12. शिराळा - मानसिंगराव नाईक
  13. विक्रमगड - सुनील भुसारा
  14. कर्जत-जामखेड - रोहित पवार
  15. अहमदपूर - विनायकराव पाटील
  16. सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर - सुधाकर भालेराव
  18. भोकरदन - चंद्रकांत दानवे
  19. तुमसर - चरण वाघमारे
  20. किनवट - प्रदीप नाईक
  21. जिंतूर - विजय कांबळे
  22. केज - पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर - संदीप नाईक
  24. वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे
  25. जामनेर - दिलीप खोडपे
  26. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
  27. मूर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व - दुनेश्वर पेठे
  29. शिरोडा - रविकांत गोगटे
  30. अहेरी - भाग्यश्री अत्राम
  31. बदनापूर - रुपकुमार बबलू चौधरी
  32. मुरबाड - सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व - राखी जाधव
  34. आंबेगाव - देवदत्त निकम
  35. बारामती - युगेंद्र पवार
  36. कोपरगाव - संदीप वर्पे
  37. शेवगाव - प्रताप ढाकणे
  38. पारनेर - राणी लंके
  39. आष्टी - मेहबूब शेख
  40. करमाळा - नारायण पाटील
  41. कोल्हापूर शहर - महेश कोठे
  42. हडपसर - प्रशांत जगताप
  43. कागल - समरजित घाटगे
  44. तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
  45. चिपळूण - प्रशांत यादव